आवृत्ती पुणे
← Back to Homepage

अश्लील फोटो व्हायरल करणाऱ्या नराधमाला अटक

Spread the love

पुणे : तरुणीचा पाठलाग करून तिला २० लाख रुपयांची खंडणी मागून, पैसे न दिल्याने सोशल मीडियावर अश्लील फोटो टाकून तिची बदनामी करणाऱ्या नराधमाला वारजे माळवाडी पोलिसांनी अटक केली आहे.

विजयसिंह संतोष गुंड (वय ३०, रा. मडेवडगाव (ढोकराई), ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत एका २४ वर्षांच्या तरुणीने वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

हा प्रकार २५ डिसेंबर २०२५ ते २२ मार्च २०२६ दरम्यान सुरू होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी आणि विजयसिंह गुंड हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. त्याचा गैरफायदा घेत विजयसिंह गुंड याने तिच्या नकळत फोटो काढले होते.

विजयसिंह गुंड हा त्या तरुणीचा पाठलाग करून तिला त्रास देत होता. त्याने तिच्याकडे २० लाख रुपयांची खंडणी मागितली. पैसे दिले नाहीत तर तिच्यासोबत असलेले अश्लील फोटो सोशल मीडियावर व्हायरल करून “खल्लास करेन”, अशी धमकी दिली.

तिच्या इच्छेविरुद्ध तिचा हात धरून स्वतःजवळ ओढून तिचा विनयभंग केला. तिने पैसे न दिल्याने त्याने गावाकडील ‘आदर्श गाव अजनुज’ या ग्रुपवर तिचे अश्लील फोटो व्हायरल करून तिची बदनामी केली.

ही बाब समजताच या तरुणीने वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी विजयसिंह गुंड याच्यावर पाळत ठेवून त्याला अटक केली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी तपास करीत आहेत.

get_footer();