आवृत्ती पुणे
← Back to Homepage

अहमदनगर मर्चंट्स को-ऑप. बँकेची उत्कृष्ट आर्थिक कामगिरी कायम : हस्तीमल मुनोत

Spread the love

अहिल्यनगर : अहमदनगर मर्चंट्स को-ऑप. बँक लि., अहमदनगरच्या संचालक मंडळाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत दि. ३१ मार्च २०२६ अखेरच्या आर्थिक वर्षासाठीचे अनऑडिटेड आर्थिक निकाल मंजूर करण्यात आले. परंपरेनुसार बँकेने स्थिर वाढ, पारदर्शक कारभार, मजबूत आर्थिक शिस्त आणि भक्कम आर्थिक पाया कायम राखत उल्लेखनीय कामगिरी नोंदवली आहे.

मागील आर्थिक वर्षात बँकेने ग्राहकहिताला प्राधान्य देत कर्जावरील व्याजदरात कपात करून ग्राहकांना दिलासा दिला. यामुळे ग्राहक समाधानात लक्षणीय वाढ झाली आहे. तसेच, या आर्थिक वर्षात बँकेला रिझर्व्ह बँकेकडून शेड्युल्ड बँकेचा दर्जा प्राप्त झाल्याची माहिती बँकेचे संस्थापक व विद्यमान चेअरमन हस्तीमल मुनोत यांनी दिली.

ग्राहकांना मोठ्या प्रमाणावर लाभ देऊनही बँकेने उत्कृष्ट आर्थिक कामगिरी नोंदवत २५.३९ कोटी रुपयांच्या व्याज सवलतीनंतर २६.७८ कोटी रुपयांचा ढोबळ नफा मिळविला आहे, जो बँकेच्या संतुलित व ग्राहकाभिमुख धोरणाचे द्योतक आहे. आयकर व रिझर्व्ह बँकेच्या नियमांनुसार आवश्यक सर्व तरतुदी केल्यानंतर बँकेने ७.४४ कोटी रुपयांचा निव्वळ नफा मिळविला आहे.

या वर्षात बँकेच्या व्यवसायात भरीव वाढ झाली असून एकूण ठेवी १६२२.३२ कोटी रुपयांवर पोहोचल्या आहेत. गतवर्षाच्या तुलनेत ठेवींमध्ये १६० कोटी रुपयांची वाढ झाली आहे. एकूण कर्जवाटप १०४९.१२ कोटी रुपये असून कर्ज वितरणात ८१ कोटी रुपयांची वाढ झाली आहे. तसेच CASA ठेवींमध्ये ६६ कोटी रुपयांची लक्षणीय वाढ नोंदविण्यात आली आहे.

बँकेच्या मालमत्ता गुणवत्तेतही मोठी सुधारणा झाली असून नेट एनपीए जवळपास ०.६३ टक्क्यांपर्यंत कमी करण्यात बँकेला यश आले आहे. एनपीए खात्यांसाठी भक्कम तरतुदी करण्यात आल्या आहेत. सध्या बँक २७१.८१ कोटी रुपयांच्या राखीव निधीसह (सद्यस्थितीत सुमारे २८७.६५ कोटी) मजबूत आर्थिक पायावर उभी आहे, ज्यामुळे ठेवीदारांचा विश्वास अधिक दृढ झाला आहे.

यावेळी चेअरमन हस्तीमल मुनोत म्हणाले की, “ग्राहकहित जपत बँकेने मजबूत नफा, भक्कम राखीव निधी आणि जवळपास शून्य एनपीए साध्य केले आहे. तंत्रज्ञान उन्नतीसह सुरक्षित, पारदर्शक आणि विश्वासार्ह सेवा देण्याचा आमचा प्रयत्न कायम राहील. बँकेच्या यशस्वी वाटचालीत सर्व संचालक, अधिकारी व कर्मचाऱ्यांचा मोलाचा वाटा आहे.”

संचालक सीए अजय मुथा यांनी सांगितले की, बँक तंत्रज्ञान उन्नतीवर विशेष भर देत असून नवीन कोअर बँकिंग सॉफ्टवेअर, यूपीआय डायरेक्ट मेंबरशिप, कॉन्टॅक्टलेस कार्ड सेवा, कार्डलेस कॅश विथड्रॉल आणि ई-मँडेट यांसारख्या आधुनिक डिजिटल सुविधा लवकरच सुरू करण्याच्या दिशेने बँक वाटचाल करत आहे. यामुळे ग्राहकांना अधिक सुरक्षित, जलद आणि सोयीस्कर सेवा मिळणार आहे.

व्हाईस चेअरमन अमित मुथा यांनी सांगितले की, काळानुरूप बदल स्वीकारत बँकेने कॉर्पोरेट बँकिंग सेवेला सुरुवात केली आहे. मुख्य शाखेचा विस्तार करत दाळमंडई येथे प्रशस्त ‘हेड ऑफिस ॲनेक्स’ उभारण्यात येत आहे. भविष्यातही शाश्वत वाढ, आधुनिक सेवा, उत्कृष्ट ग्राहक अनुभव आणि आर्थिक समावेशनासाठी बँक कटिबद्ध राहील.

या बैठकीस चेअरमन हस्तीमल मुनोत, व्हाईस चेअरमन अमित मुथा, संचालक आनंदराम मुनोत, संजय बोरा, किशोर गांधी, सीए आयपी अजय मुथा, संजय चोपडा, किशोर मुनोत, संजीव गांधी, सुभाष बायड, प्रमिलाताई बोरा, मिनाताई मुनोत, विजय कोथिंबीरे, सुभाष भांड, सीईओ सुनील पुराणिक, जॉइंट सीईओ नितीन भंडारी, कर्मचारी प्रतिनिधी प्रसाद गांधी व जितेंद्र बोरा आदी उपस्थित होते.

get_footer();