आवृत्ती पुणे
← Back to Homepage

आंदेकर टोळीच्या बेकायदा बांधकामावर पोलिसांची कारवाई

Spread the love

पुणे : आयुष कोमकर खून प्रकरणातील सूत्रधार आंदेकर टोळीचा म्होरक्या सूर्यकांत उर्फ बंडु आंदेकर आणि त्याच्या कुटुंबीयांनी घरासमोर केलेल्या बेकायदा बांधकामांवर पुणे पोलिसांनी महापालिकेच्या मदतीने कारवाई करत ती जमीनदोस्त केली.

आंदेकर कुटुंबीयांनी नाना पेठेतील डोके तालीम परिसरात बेकायदा बांधकामे केली होती. आंदेकर कुटुंबीयांचे ५२५ स्क्वेअर फुटाचे पत्राशेड, ५२५ स्क्वेअर फुटाचे पक्के बांधकाम, १०० स्क्वेअर फुटाचे पत्राशेड, १०० स्क्वेअर फुटाचे पक्के बांधकाम, ५० स्क्वेअर फुटाचे पत्राशेड, ५० स्क्वेअर फुटाचे पक्के बांधकाम आणि २०० स्क्वेअर फुटाचे शौचालय अशी एकूण आठ पक्की बांधकामे महापालिकेने जेसीबीच्या सहाय्याने पाडून टाकली.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस उपायुक्त ऋषिकेश रावळे यांच्या मार्गदर्शनाखाली समर्थ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गित्ते व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली.

get_footer();