कामगार दिनानिमित्त श्री वर्धमान मानवसेवा फाउंडेशनकडून बेरीगेट भेट
नांदेड सिटी व सिंहगड रोड पोलिस ठाण्यांना प्रत्येकी ८ बेरीगेट; पोलीस अधिकाऱ्यांसह नागरिकांची उपस्थिती
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : १ मे कामगार दिनानिमित्त श्री वर्धमान मानवसेवा फाउंडेशनने सामाजिक भान जपत पुण्यातील दोन पोलिस स्टेशनना प्रत्येकी ८ बेरीगेट भेट दिले. या उपक्रमात अनेक पोलीस अधिकारी व सामाजिक कार्यकर्ते सहभागी झाले.
श्री वर्धमान मानवसेवा फाउंडेशनच्या वतीने १ मे २०२५ रोजी कामगार दिनानिमित्त नांदेड सिटी पोलिस स्टेशनला ८ बेरीगेट भेट देण्यात आले. यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल भोस, सहाय्यक पोलीस फौजदार राजेंद्र बेंडाले, पोलीस हवालदार किशोर कुंभार, निलेश तनपुरे, नितीन खुटवड, अमित साळुंखे, महिला पोलीस हवालदार काजल ननावरे, तसेच पोलीस शिपाई दिगंबर साळुंखे व सतीश खोत उपस्थित होते.
यानंतर सिंहगड रोड पोलिस स्टेशनला देखील ८ बेरीगेट भेट देण्यात आले. यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप दाईंगडे, पोलीस उपनिरीक्षक अमोल मालुसरे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सतीश नागोल, पोलीस हवालदार जांभुळकर, मयूर शिंदे, अविनाश शिंदे, महिला पोलीस हवालदार सुजाता कार्पे व शीला जाधव उपस्थित होते.
या दोन्ही उपक्रमांना भारतीय जनता पार्टी पुणे जिल्हा जैन प्रकोष्ठचे अध्यक्ष भरत भुरट यांच्यासह ज्योती भुरट, मयुरेश भुरट, विराज भुरट, नंदकुमार ओसवाल, विक्रम छाजेड, शांताराम वसवे, दशरथ पाटील, दिगंबर डेडे आणि राजेश कोल्हे यांची उपस्थिती होती.
