आवृत्ती पुणे
← Back to Homepage

कारचालकाची मुजोरी! अपघातानंतर वाहनचालकाला फरफटत नेले

Spread the love

पुणे : भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने समोर असलेल्या दुसऱ्या कारला मागून धडक दिली. त्यानंतर अपघातस्थळावरून पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या कारचालकाला थांबवण्याचा प्रयत्न करणाऱ्या चालकाच्या अंगावर कार घालण्यात आली. कारचालकाने त्या व्यक्तीस बोनेटवर धरून काही अंतर फरफटत नेले. यावेळी पोलीस अंमलदाराच्या अंगावरही गाडी घालण्याचा प्रयत्न करण्यात आला.

या प्रकरणी वाहतूक शाखेचे पोलीस अंमलदार सचिन चव्हाण यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी कारचालक विष्णू साबळे (वय २२, रा. पिंपरी सांडस, ता. हवेली) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

हा प्रकार खराडी बायपास चौकात मंगळवारी सकाळी सव्वा दहाच्या सुमारास घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी सव्वा दहाच्या सुमारास खराडी बायपास चौकातून कारचालक विष्णू साबळे भरधाव वेगाने जात होता.

त्याच्या कारने समोर असलेल्या एका कारला पाठीमागून धडक दिली. त्यामुळे कारचे नुकसान झाले आणि संबंधित चालक खाली उतरून साबळे याला थांबवण्याचा प्रयत्न करू लागला. मात्र, साबळेने त्याच्या अंगावर कार घातली आणि त्याला फरफटत नेले.

यावेळी पोलीस अंमलदार सचिन चव्हाण यांनी त्याला अडवण्याचा प्रयत्न केला असता, साबळेने त्यांच्या अंगावरही गाडी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी साबळे याला अटक केली असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

get_footer();