आवृत्ती पुणे
← Back to Homepage

किरकोळ कारणावरून अल्पवयीन मुलांकडून युवकावर कोयत्याने हल्ला : खुनाचा प्रयत्न

Spread the love

पुणे : किरकोळ कारणावरून तिघा अल्पवयीन मुलांनी एका युवकावर कोयत्याने हल्ला करून त्याचा खुनाचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना अप्पर इंदिरा नगर येथे रविवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली.

गौरव सोनकांबळे (वय १८, रा. अप्पर इंदिरा नगर) असे जखमी युवकाचे नाव असून, त्याला गंभीर दुखापत झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, किरकोळ कारणावरून गौरव सोनकांबळे आणि तिघा अल्पवयीन मुलांमध्ये वाद झाला.

वाद वाढताच त्यांच्यातील एकाने गौरवच्या डोक्यात कोयत्याने वार करून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. हल्ल्यानंतर रक्ताच्या थारोळ्यात गौरव पडल्याचे पाहून हल्लेखोर मुलं घटनास्थळावरून पळून गेली. घटनेची माहिती मिळताच बिबवेवाडी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि गौरव सोनकांबळे याला उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल केले.

बिबवेवाडी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक अश्विनी सातपुते यांनी सांगितले की, “जखमी गौरव सोनकांबळे याच्यावर रात्री शस्त्रक्रिया करण्यात आली असून सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे. या प्रकरणात तिघा अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे.”

get_footer();