आवृत्ती पुणे
← Back to Homepage

कोंढवा बुद्रुकमध्ये अवैध बांधकामांवर कारवाई

Spread the love

पुणे : कोंढवा बुद्रुक, सर्वे नंबर ५ येथे महापालिकेच्या आदेशानुसार पुणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने कारवाई करत अवैध बांधकामांवर बुलडोझर चालवला.

या कारवाईमध्ये चार दोन मजली घरे आणि पाच दोन मजली पत्र्याचे शेड जमीनदोस्त करण्यात आले. नागरिकांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, त्यांना काल रात्री उशिरा नोटीस देण्यात आली व सकाळीच कारवाई सुरु करण्यात आली.

त्यामुळे त्यांना वेळेवर कोणतीही पूर्वतयारी करता आली नाही. यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप असून त्यांनी प्रशासनाच्या या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली आहे.

get_footer();