आवृत्ती पुणे
← Back to Homepage

खंडणी वसूल करणाऱ्या आंदेकर टोळीतील चार वसुली पंटर जेरबंद

Spread the love

पुणे : गणेश पेठेतील मासळी बाजारातील विक्रेत्यांकडून आंदेकर टोळीसाठी दरमहा १५ ते ५० हजार रुपयांचा हप्ता वसूल करणाऱ्या चौघा वसुली पंटरांना फरासखाना पोलिसांनी अटक केली आहे.

शेखर दत्तात्रय अंकुश, मनीष वर्देकर, सागर बाळकृष्ण भोपटे (सर्व रा. नाना पेठ) आणि रोहित सुधाकर बहाद्दुरकर (रा. हडपसर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली असून त्यांचा गुन्हेगारी रेकॉर्ड तपासण्याचे काम सुरू आहे.

पडद्याआड राहून हे चौघे आंदेकर टोळीसाठी वसुली करत होते. मासळी बाजारातून खंडणी उकळल्याप्रकरणी माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची पत्नी सोनाली आंदेकर हिलाही आरोपी करण्यात आले आहे.

आयुष कोमकर खून प्रकरणानंतर पोलिसांनी आंदेकर टोळीविरुद्ध मोक्का अंतर्गत कारवाई केली. आंदेकर टोळीला आर्थिक रसद कशी मिळते, यादृष्टीने पोलिसांनी तपास सुरू केला. आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू याच्यासह साथीदारांची बँक खाती गोठविण्यात आली.

त्या खात्यांमध्ये ५० लाखांची रोकड आढळून आली. तसेच आंदेकरच्या घरातून ७७ तोळे सोन्याचे दागिने, मोटार व जमीन व्यवहारांची कागदपत्रे जप्त करण्यात आली. गणेश पेठ मासळी बाजारातून आंदेकर टोळी प्रत्येक विक्रेत्याकडून दरमहा १५ ते २० हजार रुपयांचा हप्ता वसूल करत होती. या प्रकरणी आंदेकरसह ११ जणांविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

get_footer();