आवृत्ती पुणे
← Back to Homepage

गँगस्टर निलेश घायवळसह कुटुंबीयांची बँक खाती गोठविली

Spread the love

पुणे : कोथरूड गोळीबार प्रकरणात कारवाई झालेला गुंड निलेश घायवळ परदेशात पसार झाल्यानंतर पोलिसांनी घायवळसह त्याच्या कुटुंबीयांच्या आर्थिक नाड्या आवळण्यास सुरुवात केली. घायवळ, त्याचे कुटुंबीय तसेच त्याच्याशी संबंधित एका कंपनीची १० बँक खाती पोलिसांनी गोठविली आहेत. या बँक खात्यांमध्ये ३८ लाख २६ हजार रुपयांची रोकड आढळून आली.

कोथरूड गोळीबार प्रकरणात निलेश घायवळसह साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. घायवळ तसेच साथीदारांविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्यात आली.

निलेश घायवळने बनावट कागदपत्रांच्या आधारे पारपत्र मिळवले. तो स्वित्झर्लंडमध्ये पसार झाला. घायवळला पकडण्यासाठी पुणे पोलिसांनी ‘लुक आऊट’ नोटीस बजावली आहे. घायवळ तसेच त्याच्या कुटुंबीयांचे आर्थिक स्रोत पोलिसांनी तपासण्यास सुरुवात केली आहे.

त्यानुसार निलेश घायवळ कुटुंब तसेच एका कंपनीची अशी एकूण १० बँक खाती गोठविण्याबाबत पोलिसांनी बँकेशी पत्रव्यवहार केला. त्यानंतर बँकेकडून निलेश घायवळ, शुभांगी घायवळ, स्वाती निलेश घायवळ, कुसुम घायवळ आणि पृथ्वीराज एंटरप्रायझेस ही बँक खाती गोठविण्यात आली आहेत.

दहा बँक खात्यांतील ३८ लाख २६ हजार रुपये आढळून आले आहेत. पुणे पोलिसांच्या परवानगीशिवाय या बँक खात्यांमधून व्यवहार करता येणार नाहीत, अशी माहिती गुन्हे शाखेतील अधिकार्‍यांनी दिली.

get_footer();