आवृत्ती पुणे
← Back to Homepage

गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान : संजय गाढवे प्रतिष्ठानचा उपक्रम

Spread the love

भूम : अखंड वसा समाजसेवेचा वर्ष १७ वे – हाक तुमची… साथ आमची” या घोषणेसोबत, विकासरत्न संजय (नाना) गाढवे प्रतिष्ठान, भूम यांच्या वतीने गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ सावित्रीबाई फुले सभागृहात संपन्न झाला.

या कार्यक्रमात विविध शाळांतील इयत्ता १० वी आणि एस.पी. कॉलेजच्या इयत्ता १२ वीच्या परीक्षेत ९५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. सत्कार समारंभाचे अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष संजय गाढवे होते.

प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगराध्यक्षा. संयोगिताताई गाढवे, पोलिस निरीक्षक प्रल्हाद सूर्यवंशी, तसेच एस. पी. कॉलेजचे प्राचार्य संतोष शिंदे उपस्थित होते. कार्यक्रमाला ताराराणी प्रशालेचे संतोष कुलकर्णी, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक तात्याबा कांबळे, श्री गुरुदेव शाळेचे दत्ता भालेराव आणि पत्रकार बांधवांचीही उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे आयोजन सुरज गाढवे, बाळासाहेब अंधारे, बालाजी माळी, महेश गपाट यांनी परिश्रम घेऊन यशस्वी केले. यावेळी माजी नगरसेवक मेहराज बेगम सय्यद, सुनील थोरात, रामभाऊ बागडे, राजू पठाण, दत्ता साठे, शिवलिंग शेंडगे यांचाही उपस्थितीत सहभाग होता.

get_footer();