आवृत्ती पुणे
← Back to Homepage

गुरुदेव दत्त हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न

Spread the love

भूम : येथील गुरुदेव दत्त हायस्कूलमधील इयत्ता दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा रामहरी मंगल कार्यालयात मोठ्या उत्साहात पार पडला. २००१-०२ या शैक्षणिक वर्षातील माजी विद्यार्थी तब्बल २५ वर्षांनंतर एकत्र आल्याने कार्यक्रम भावनिक आणि आनंदमयी वातावरणात पार पडला.

या स्नेहसंमेलनास सतीश देशमुख, किरण जाधव, विठ्ठल कोळी, अनिल मोटे, संदीप बागडे, महावीर भोपलकर, ए. के. गायकवाड, कमलाकर साबळे, चंद्रकांत तांबे, अंकुश उगलमुगले, गपाट, कुटे, बारबोले, बांगर, पालकर, गायकवाड, अलगट, पालके, शेळके, शेख यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कल्याणराव मोटे हे होते.

कार्यक्रमाची सुरुवात आलम प्रभू देवस्थान येथे आरती करून करण्यात आली. त्यानंतर माजी विद्यार्थ्यांनी गुरुदेव दत्त हायस्कूलला भेट दिली. शाळेतील परंपरेनुसार राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

दिवंगत शिक्षक, विद्यार्थी व विद्यार्थिनींच्या पतींना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तसेच छत्रपती शिवाजी महाराज व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीपप्रज्वलन करण्यात आले. सर्व शिक्षक-शिक्षिकांचा विद्यार्थ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

काही माजी विद्यार्थ्यांचाही विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी शिक्षक व विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. कोरोना काळात दिवंगत झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना आर्थिक सहकार्यही देण्यात आले.

या स्नेहमेळाव्यासाठी अमेरिका, कॅनडा, गुजरात, मुंबई, पुणे, कोल्हापूर, सातारा, इचलकरंजी, धाराशिव येथून माजी विद्यार्थी आवर्जून उपस्थित राहिले होते, तर काही विद्यार्थी स्थानिक होते. सर्वांनी एकमेकांशी संवाद साधत जुन्या आठवणींना उजाळा दिला. विचारांची देवाणघेवाण झाली आणि कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.

या वेळी अमोल गुंजाळ, सचिन पौळ, धनंजय शेटे, अमोल माळी, मयूर शाळू, संतोष वीर, प्रेम महाजन, सुजित वेदपाठक, अमित होळकर, भरत गाढवे, सुहास माळी, हरी बोत्रे, संदीप गरड, दीपाली वरवडे, नूर मोमीन, माधवी मोकाशे, ॲड. अमरजा खोसे, हर्ष सातपुते, स्नेहा मोटे, कांचन जगताप, हेमा जाधव, मनीषा खराडे, सुप्रिया माळी आदी विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

get_footer();