आवृत्ती पुणे
← Back to Homepage

गॅस पुरवठा खंडित करण्याची भीती दाखवून फसवणूक

Spread the love

पुणे : गॅस पुरवठा खंडित करण्याची भीती दाखवून सायबर चोरट्यांनी मॉडेल कॉलनीतील एका नागरिकाची ४ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. हा प्रकार १२ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी घडला होता.

याबाबत मॉडेल कॉलनीतील ५८ वर्षीय नागरिकाने चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मॉडेल कॉलनी परिसरात वाहिनीद्वारे गॅस पुरवठा होतो. गॅस देयक थकित असून गॅस पुरवठा खंडित करण्यात येणार आहे, असा मेसेज फिर्यादीच्या पत्नीच्या मोबाईलवर पाठवण्यात आला.

फिर्यादींना अॅप्लिकेशनवर रजिस्ट्रेशन फी म्हणून १५ रुपये भरण्यास सांगून बँकेची डिटेल्स घेण्यात आली. त्याद्वारे सायबर चोरट्यांनी मोबाईल क्रमांक हॅक करून बँक खात्यातील ३ लाख ९८ हजार रुपये ऑनलाइन पद्धतीने दुसऱ्या खात्यात जमा करून घेतले.

खात्यातून पैसे कमी झाल्याचे लक्षात आल्यानंतर तक्रारदारांनी पोलिसांकडे फिर्याद दिली. पोलीस निरीक्षक अश्विनी ननावरे तपास करत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून गॅस, वीज देयक थकीत असून त्वरित पुरवठा खंडित करण्यात येणार आहे, अशी भीती दाखवून चोरट्यांकडून फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत.

get_footer();