आवृत्ती पुणे
← Back to Homepage

चाकूचा धाक दाखवून मोबाईलवरून पैसे ट्रान्सफर करून घेतले

Spread the love

पुणे : मोबाईलवर चॅटिंग करत असताना ओळख झालेल्याने दोघा साथीदारांना घेऊन तिघांनी मिळून चाकूचा धाक दाखवून मोबाईल हिसकावून घेतला. पासवर्ड घेऊन त्याद्वारे फोनपेवरून ६० हजार रुपये ट्रान्सफर करून घेण्याचा प्रकार समोर आला आहे.

याबाबत अनिलसिंग पदमसिंग सोलंकी (वय ३३, रा. लक्ष्मी रोड, नारायण पेठ) यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून पोलिसांनी शाहिद शेख आणि त्याच्या दोन साथीदारांविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

ही घटना ९ जून रोजी सायंकाळी साडेसहा वाजता मंगळवार पेठेतील जुना बाजार येथे घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे मोबाईलवर चॅटिंग करत असताना आरोपीशी ओळख झाली.

शाहिद शेख हा दोन साथीदारांसह मंगळवार पेठेतील जुना बाजार येथे आला. त्यांनी चाकूचा धाक दाखवून त्यांच्या मोबाईलची जबरदस्तीने हिसका घेतला. त्यांना शिवीगाळ करून हाताने मारहाण केली.

जीवे ठार मारण्याचा धाक दाखवत मोबाईलमधील फोनपेचा पासवर्ड घेतला आणि त्याद्वारे ६० हजार रुपये कोणाच्या तरी खात्यात ट्रान्सफर करून घेतले.
सहायक पोलीस निरीक्षक शितल जाधव तपास करीत आहेत.

वॉकिंग करत असताना, मोटारसायकलवरून आलेल्या तिघा चोरट्यांनी हत्याराचा धाक दाखवून युवकाकडील मोबाईल जबरदस्तीने घेतला. ही घटना रेंजहिल्स येथील औंध रोडवरील अमृत स्वीट मार्ट दुकानासमोर ९ जून रोजी पहाटे पाच वाजता घडली.

एक १७ वर्षांचा युवक पहाटे फिरायला चालला होता. यावेळी दुचाकीवरून तिघेजण आले. त्यांनी हत्याराचा धाक दाखवून त्याच्याकडील २० हजार रुपयांचा मोबाईल हिसकावून नेला.

get_footer();