आवृत्ती पुणे
← Back to Homepage

चारित्र्याच्या संशयावरून विवाहितेचा खून

Spread the love

पुणे : चारित्र्याचा संशय घेऊन पतीने केलेल्या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या विवाहितेचा उपचार सुरू असताना गुरुवारी पहाटे मृत्यू झाला. बिबवेवाडी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून पानटपरी चालक पतीला अटक केली आहे.

सारिका शुभम घोडके (वय २३) असे मृत्यू पावलेल्या विवाहितेचे नाव आहे. शुभम श्रीकांत घोडके (वय २९, रा. अंबिकानगर, अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी) याला अटक करण्यात आली आहे. सारिका हिची आई गेणीबाई रुपसिंग चव्हाण (वय ५०, रा. अंबिकानगर, अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी) यांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना त्यांच्या राहत्या घरात २४ मार्च रोजी दुपारी ४ वाजता घडली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुभम घोडके हा पानटपरी चालवितो. सारिका ही गृहिणी होती. त्यांना एक मुलगा व एक मुलगी आहे. शुभम हा तिच्या चारित्र्यावर नेहमी संशय घेत असे. २४ मार्च रोजी दुपारी तो घरी आला. त्याने सारिकाच्या चारित्र्याचा संशय घेऊन कोणत्यातरी हत्याराने तिच्या डोक्यावर, हातावर आणि पायावर वार करून तिला गंभीर जखमी करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला.

सारिका हिच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात येत होते. बिबवेवाडी पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा बुधवारी रात्री दाखल करून शुभम घोडके याला अटक केली. उपचार सुरू असताना गुरुवारी पहाटे सारिका हिचा मृत्यू झाला. त्यानंतर बिबवेवाडी पोलिसांनी खुनाचे कलम वाढविले आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अश्विनी सातपुते तपास करीत आहेत.

← Back to Homepage

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा कुऱ्हाडीने घाव घालून खुन

Spread the love

पुणे : चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा डोक्यात घाव घालून खुन करणाऱ्या पतीस पोलिसांनी अटक केली आहे. कौटुंबिक वादातून हा प्रकार घडल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लोणीकंद पोलीस स्टेशन हद्दीत बुर्के गाव येथे ही खळबळजनक घटना घडली आहे. लक्ष्मी बाबासाहेब जाधव (वय ५०) असे खून झालेल्या पत्नीचे नाव आहे. तर पोलिसांनी तातडीने हालचाल करीत आरोपी बाबासाहेब मारुती जाधव (वय ५३ वर्षे, रा. मु.पो. बुर्केगाव, ता. हवेली जि. पुणे) याला अटक केली आहे.

या प्रकरणी मयत महिलेच्या मुलीने लोणीकंद पोलीसात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कौटुंबिक वादातून ही घटना घडल्याची शक्यता व्यक्त होत आहे. पती-पत्नी रात्री घरात झोपले होते. त्यावेळी त्यांच्यात झालेला वाद वाढत गेला.

त्यातून मध्यरात्री बाबासाहेब जाधव याने पत्नी लक्ष्मी हिच्या डोक्यात कुऱ्हाडीने घाव घातले. त्यात तिचा जागीच मृत्यू झाला. फिर्याद देणाऱ्या मुलीने सकाळी आईला फोन केला, पण फोन उचलला जात नसल्याने तिने आईच्या घराकडे धाव घेतली.

त्यावेळी हा खुनाचा प्रकार उघडकीस आला. लक्ष्मीच्या डोक्यावर, मानेवर कुऱ्हाडीचे वार होते. या घटनेमुळे बुर्केगाव परिसरात खळबळ उडाली आहे. हा तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) निलेश जगदाळे करीत आहेत.

get_footer();