आवृत्ती पुणे
← Back to Homepage

जीवनसाथीवरील ओळख महिलेला पडली महागात

Spread the love

पुणे : जीवनसाथी या मॅट्रिमोनी साईटवर झालेली ओळख एका महिलेला चांगलीच महागात पडली आहे. या महिलेला लग्नाचे आमिष दाखवून, “शेअर मार्केट शिकवतो,” असे सांगत डेव्हलपमेंट बँक ऑफ सिंगापूरच्या नागपूर शाखेत खाते उघडण्यास लावून तिला ११ लाख ७४ हजार रुपयांना गंडवले आहे. विशेष म्हणजे त्याने स्वतःचा मृत्यू झाल्याचा बनाव केला आहे.

याबाबत सहकारनगर येथील ४४ वर्षीय महिलेने सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी हर्ष भार्गव या नावाने जीवनसाथी या वेबसाईटवर प्रोफाइल तयार करणाऱ्या तरुणाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार एप्रिल २०२४ ते २७ मार्च २०२५ दरम्यान घडला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेने जीवनसाथी या विवाहविषयक वेबसाईटवर नाव नोंदवले होते. त्यावरून हर्ष भार्गव या नावाने ओळख वाढवून त्याने लग्नाचे आमिष दाखवले.

त्यानंतर, “मी शेअर मार्केट शिकवतो,” असे सांगून तिच्या नावाने डेव्हलपमेंट बँक ऑफ सिंगापूरच्या नागपूर शाखेत ऑनलाइन खाते उघडायला लावले. त्या बँक खात्याला त्याने स्वतःचा मोबाईल नंबर लिंक करून घेतला.

त्या खात्यावर वेळोवेळी वेगवेगळी कारणे सांगून फिर्यादीकडून एकूण ११ लाख ७४ हजार ४२० रुपये पाठवायला लावले. तसेच फिर्यादी यांच्या नावावर मनाप्रमाणे एकूण १३ लाख १९ हजार २१० रुपयांचे मणप्पुरम गोल्ड लोन घेतले.

हे लोन परत केले नाही आणि फिर्यादीशी लग्नही केले नाही. नंतर एका प्रोजेक्टसाठी परदेशात जात असल्याचे सांगून स्वतःच्या अपघाती मृत्यूचा बनाव केला. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक एस. डी. फकीर करत आहेत.

get_footer();