आवृत्ती पुणे
← Back to Homepage

डिजिटल माध्यमांवरील बंदीविरोधात महापालिकेबाहेर निषेध आंदोलन

Spread the love

पुणे : पुणे महानगरपालिकेच्या मुख्य सभेचे वार्तांकन डिजिटल माध्यमांना करण्यास बंदी घालण्याच्या निर्णयाविरोधात आज तीव्र निषेध नोंदवण्यात आला.श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृह बाहेर ज्येष्ठ पत्रकार शरद लोणकर यांनी ठिय्या आंदोलन करत निर्णयाचा निषेध व्यक्त केला.

या आंदोलनाला पुणे मराठी पत्रकार संघच्या वतीने पाठिंबा देण्यात आला. संघाचे अध्यक्ष धनराज गरड यांनी महापौर मंजुषा नागपुरे यांना निवेदन सादर करून हा निर्णय तात्काळ मागे घेण्याची मागणी केली.

निवेदनात नमूद करण्यात आले की, पारंपरिक माध्यमांना परवानगी देऊन डिजिटल माध्यमांना नकार देणे हा दुहेरी निकष असून तो अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि माहितीच्या समान हक्कावर परिणाम करणारा आहे. आजच्या काळात डिजिटल मीडिया हे नागरिकांपर्यंत जलद, पारदर्शक आणि थेट माहिती पोहोचवणारे प्रभावी माध्यम बनले आहे.

महापालिकेच्या मुख्य सभेतील कामकाज जनतेपर्यंत व्यापक स्वरूपात पोहोचावे, यासाठी डिजिटल माध्यमांनाही समान संधी द्यावी, अशी मागणी आंदोलकांनी केली. निर्णयाचा पुनर्विचार न झाल्यास पुढील काळात आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. यावेळी पुणे मराठी पत्रकार संघाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.अशी माहिती धनराज गरड यांनी दिली.

get_footer();