आवृत्ती पुणे
← Back to Homepage

दिवाळीत पूरग्रस्तांच्या चेहऱ्यावर आनंदाची दिवटी

Spread the love

बार्शी : महाराष्ट्रातील अतिवृष्टीमुळे पूराने अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले असताना बार्शीतील सिल्व्हर ज्युबिली बालक मंदिर विभागाने माणुसकीचा दिवा पेटवला.

मुख्याध्यापिका सौ. दिपाली गोरे मॅडम यांच्या संकल्पनेतून शाळा व पालकांच्या संयुक्त विद्यमाने मांडेगाव येथील पूरग्रस्त कुटुंबांना तसेच अंगणवाडीतील लहान मुलांना दिवाळीसाठी आवश्यक शिधासाहित्य, वस्त्रे, टॉवेल, आकाशदिवे, तसेच मुलांना ड्रेस व शालेय साहित्य दिले गेले.

कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती अभिषेक पंपट, सतीश मिरगणे (उपसरपंच), ग्रामसेवक इंगळे, पोलीस पाटील राहुल बंडू, रोजगार सेवक उमेश मिरगणे, ग्रामपंचायत सदस्य बबन मिरगणे, सुरेश पायघन व जीवन दळवी यांची होती. सूत्रसंचालन गजानन दळवी यांनी केले.

मुख्याध्यापिका सौ. दिपाली गोरे यांनी सांगितले की, “ही केवळ समाजसेवा नाही तर करुणेचा खरा अर्थ आहे.” या उपक्रमात दिपाली कळसकर, पूनम वासकर, भारती चोपडे, तेजश्री स्वामी, लखन जाधव व मंगळवेढेकर मावशी यांनी परिश्रम घेतले.

get_footer();