आवृत्ती पुणे
← Back to Homepage

नव्या २ परिमंडळांच्या निर्मितीमुळे पोलीस उपायुक्तांच्या अंतर्गत बदल्या

Spread the love

पुणे : शहर पोलीस दलात २ नवीन परिमंडळांची निर्मिती करण्यात आली आहे. जुन्या कार्यक्षेत्राचे विभाजन करून नवीन परिमंडळ स्थापन करण्यात आले आहेत. त्यानुसार नवीन पोलीस उपायुक्त, सहायक पोलीस आयुक्त तसेच काही पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत.

राज्य राखीव पोलीस दल, गट ७ दौंडचे समादेशक चिलुमुला रजनीकांत यांची परिमंडळ ४ च्या पोलीस उपायुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राजलक्ष्मी शिवणकर यांची पोलीस मुख्यालयातून परिमंडळ ५ च्या पोलीस उपायुक्तपदी बदली करण्यात आली आहे.

पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांची परिमंडळ ५ येथून परिमंडळ ६ च्या पोलीस उपायुक्तपदी नियुक्ती झाली आहे. परिमंडळ ४ चे सोमय मुंडे यांची परिमंडळ ७ चे पोलीस उपायुक्त म्हणून बदली झाली आहे.

पुण्यात नव्याने आलेले सागर कवडे यांची पोलीस उपायुक्त (मुख्यालय) येथे नियुक्ती देण्यात आली आहे. याचबरोबर परिमंडळ ६ व ७ साठी प्रत्येकी २ सहायक पोलीस आयुक्त पदांची निर्मिती करण्यात आली आहे. त्यामुळे शहरातील सहायक पोलीस आयुक्तांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत.

नवीन ५ पोलीस ठाण्यांची निर्मिती करण्यात आल्याने काही पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. तसेच काही सहायक पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक, पोलीस हवालदार व पोलीस अंमलदार यांची नवीन ५ पोलीस ठाण्यांमध्ये बदली करण्यात आली आहे.

get_footer();