आवृत्ती पुणे
← Back to Homepage

परिमंडळ ४ मधील २०९ हरवलेले मोबाईल परत

Spread the love

पुणे : परिमंडळ ४ मधील हरविलेले/गहाळ झालेले २०९ मोबाईल अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील यांच्या हस्ते मूळ मालकांना समारंभपूर्वक परत करण्यात आले.

परिमंडळ ४ अंतर्गत चतु:श्रृंगी, बाणेर, खडकी, शिवाजीनगर, लोणीकंद, वाघोली, खराडी, येरवडा, विश्रांतवाडी, विमानतळ या पोलीस ठाण्यांच्या कार्यक्षेत्रातील सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टर (CEIR) या पोर्टलवरील तक्रारी तसेच पुणे शहर पोलीस दलाच्या वेबसाईटवरील लॉस्ट अ‍ॅण्ड फाऊंड वर नोंदविण्यात आलेल्या तक्रारींच्या आधारे २८ लाख ३५ हजार रुपयांचे २०९ मोबाईल हस्तगत करण्यात पोलिसांना यश मिळाले.

अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील यांच्या हस्ते हे मोबाईल मालकांना परत करण्यात आले. या कार्यक्रमाला पोलीस उपायुक्त सोमय मुंडे, सहायक पोलीस आयुक्त विठ्ठल दबडे आणि प्रांजली सोनवणे तसेच सर्व पोलीस ठाण्यांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, अधिकारी, अंमलदार उपस्थित होते.

get_footer();