आवृत्ती पुणे
← Back to Homepage

पालखीचे लोकेशन करणार घरबसल्या

Spread the love

पुणे : संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्या त्यांच्या मार्गावर नेमक्या कोठे आहेत, याची माहिती आता नागरिकांना घरबसल्या मिळणार आहे. ही माहिती मिळाल्याने नागरिकांना दर्शनासाठी खूप अगोदर येण्याची गरज भासणार नाही. पालखी रथ दर्शनाची माहिती मिळाल्यामुळे रस्त्यावरील अनावश्यक गर्दी टाळता येणे शक्य होणार आहे.

संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्यासह अनेक पालख्यांचे शुक्रवारी शहरात आगमन होणार आहे. पालखीच्या दर्शनासाठी नागरिक सकाळपासूनच पालखी मार्गावर गर्दी करतात.

तसेच काही लाख भाविक आळंदी तसेच आकुर्डी येथून पुण्यात पायी पालखीबरोबर येत असतात. त्यामुळे नागरिकांना पालखीचे अचूक लोकेशन मिळावे याकरिता पालखीच्या पुढे व शेवटी जीपीएस ट्रॅकिंगसह मार्शल नेमले असून, याद्वारे नागरिक पालखीचे अचूक स्थान ट्रॅक करू शकतात.

यावर्षी प्रथमच पालखी रथावर जीपीएस ट्रॅकिंग सिस्टीम बसविण्यात येणार आहे. जेणेकरून दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना वेळेत पालखीचे ‘हेड’, ‘टेल’ व रथ कोणत्या ठिकाणी आहे याची माहिती मिळून रस्त्यावरील अनावश्यक गर्दी टाळता येईल.

पुणे पोलीस आयुक्तालयाच्या वाहतूक शाखेमार्फत नागरिकांना आवाहन करण्यात येते की पालखीविषयक सर्व प्रकारच्या माहितीसाठी https://diversion.punepolice.gov.in या लिंकचा वापर करावा.

get_footer();