आवृत्ती पुणे
← Back to Homepage

पालखीमध्ये भाविकांचे सोन्याचे दागिने, मोबाईल चोरणाऱ्या टोळ्या जेरबंद

Spread the love

पुणे : संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या गर्दीचा गैरफायदा घेऊन त्यांच्या गळ्यातील दागिने व मोबाईल चोरणाऱ्या आंतरराज्य टोळ्यांना गुन्हे शाखेच्या युनिट ५ व युनिट ६ च्या पथकाने जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून तब्बल २२ तोळ्यांचे दागिने व १४ मोबाईल असा एकूण २३ लाख ९१ हजार १३० रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे.

चांदणी शक्ती कांबळे (वय ३२, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर), रिटा ऊर्फ गंगा नामदेव कांबळे (वय ३५, रा. उदगीर, जि. लातूर), बबिता सुरज उपाध्ये (वय ५७), पूजा धीरज कांबळे (वय ३५, सर्व रा. उदगीर, जि. लातूर), गणेश विलास जाधव (वय ३०, रा. सोलापूर, मुळगाव ब्यागळी, ता. अक्कलकोट, जि. सोलापूर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

पालखी सोहळ्याच्या निमित्ताने गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग करत असताना पोलीस अंमलदार नितीन मुंढे व कानिफनाथ कारखिले यांना माहिती मिळाली की लातूरहून दागिने चोरणारी महिलांची टोळी पुण्यात आली असून त्यांनी काही महिलांचे दागिने चोरले आहेत व त्या सोलापूरला जाण्याच्या तयारीत आहेत.

या माहितीनुसार पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी पालखी दरम्यान भाविकांच्या गळ्यातील दागिने चोरल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून सोन्याचे २० मिनी गंठण व मंगळसूत्र असे एकूण १९ लाख ४१ हजार ३१० रुपयांचे, २२ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले.

हडपसर व लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील दोन गुन्हे उघडकीस आले आहेत. यासोबतच पालखी सोहळ्यादरम्यान अरबाज नौशाद शेख (वय १९, रा. साहेबगंज, झारखंड) व एका अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले.

त्यांच्या कब्जात वेगवेगळ्या कंपनीचे एकूण १४ मोबाईल मिळाले. हडपसर पोलीस ठाण्यातील दोन व वानवडी पोलीस ठाण्यातील एक, असे एकूण तीन मोबाईल चोरीचे गुन्हे उघडकीस आले असून अन्य मोबाईलच्या मालकांचा शोध सुरू आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अप्पर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक वाहिद पठाण, संजय पतंगे, सहाय्यक पोलीस निरीक्षक मदन कांबळे, पोलीस अंमलदार राजस शेख, नितीन मुंढे, कानिफनाथ कारखिले, प्रताप गायकवाड, विनोद शिवले, पल्लवी मोरे, स्वाती तुपे, बाळासाहेब सकटे, अकबर शेख, शेखर काटे, ऋषिकेश व्यवहारे, ऋषिकेश ताकवणे, सचिन पवार, कीर्ती मांदळे, प्रतीक्षा पानसरे, निलेश साळवे, सुहास डोंगरे, वैशाली इंगळे, ज्योती मुल्का, वैशाली खेडेकर, सारंग दळे, निर्णय लांडे, जावेद शेख यांनी केली आहे.

get_footer();