आवृत्ती पुणे
← Back to Homepage

पुणे जिल्ह्यातील ओतूरमध्ये बांगलादेशी सापडले

Spread the love

पुणे : पुणे जिल्ह्यातील ओतूर परिसरात बनावट कागदपत्रांद्वारे बेकायदा वास्तव्य करणाऱ्या दोन बांगलादेशींना राज्य दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) पकडले. त्यांच्याकडून बनावट ओळखपत्रे जप्त करण्यात आली आहेत.

ताजमीर मोश्ताफा अन्सारी (वय २९) आणि मोहम्मद अलिमूल गुलाम अन्सारी (वय २८, सध्या रा. ओतूर, मूळ रा. बोकराई, जिल्हा शारखीरा, बांगलादेश) अशी ताब्यात घेण्यात आलेल्यांची नावे आहेत.

त्यांच्याविरुद्ध ओतूर पोलीस ठाण्यात बेकायदा वास्तव्य, तसेच परकीय नागरिक अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ताजमीर आणि मोहम्मद हे मूळचे बांगलादेशातील असून, ते ओतूर परिसरात बेकायदा वास्तव्य करत असल्याची माहिती एटीएसच्या पथकाला मिळाली होती.

त्यानंतर एटीएस व ओतूर पोलिसांच्या पथकाने संयुक्त कारवाई करत त्यांना अटक केली. त्यांच्याकडून बनावट आधार कार्ड, पॅनकार्ड, वाहन परवाना, मोबाईल संच, तसेच कालबाह्य झालेले बांगलादेशी पारपत्र आणि व्हिसाची कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत.

ही कारवाई दहशतवादविरोधी पथकाच्या पोलीस निरीक्षक सुजाता तानवडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे, हवालदार शरद जाधव, तांदळवाडे आणि त्यांच्या पथकाने केली.

get_footer();