आवृत्ती पुणे
← Back to Homepage

बार्शीचा राजवर्धन तिवारीची दमदार कामगिरी – राष्ट्रीय स्तरावर दुसऱ्या क्रमांकावर झेप

Spread the love

राष्ट्रीय स्पर्धेत रौप्यपदक : मानांकनात १२० गुणांची भर

बार्शी : महाराष्ट्रातील उदयोन्मुख टेबल टेनिसपटू राजवर्धन तिवारी याने अलीकडील राष्ट्रीय स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत आपली छाप पाडली आहे. सध्या महाराष्ट्रात दुसऱ्या क्रमांकावर असलेला राजवर्धन राष्ट्रीय स्तरावर चौथ्या क्रमांकावर होता. मात्र, ताज्या कामगिरीनंतर तो आता राष्ट्रीय क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर पोहोचण्याच्या मार्गावर आहे.

वडोदरा (गुजरात) आणि पंचकुला (हरियाणा) येथे पार पडलेल्या राष्ट्रीय मानांकन स्पर्धांमध्ये राजवर्धनने उत्कृष्ट खेळ करत दोन्ही ठिकाणी कांस्यपदक पटकावले. त्यानंतरच्या राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत त्याने दमदार खेळाची मालिका कायम ठेवत अंतिम फेरी गाठली.

उपांत्यपूर्व फेरीत त्याने पश्चिम बंगालच्या हृदान बिस्वास याच्यावर ३-० (१३-११, ११-७, ११-९) असा सरळ विजय मिळवला. उपांत्य फेरीत देवांशू चक्रवर्ती याच्यावरही ३-० (११-८, ११-७, ११-६) असा एकतर्फी विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला.

अंतिम सामन्यात अव्वल मानांकित राजदीप बिस्वास याच्याविरुद्ध राजवर्धनला ०-३ (१०-१२, ४-११, ६-११) अशी हार पत्करावी लागली. तरीही या स्पर्धेत मिळवलेल्या रौप्यपदकामुळे त्याच्या मानांकनात १२० गुणांची वाढ झाली आहे.

नवीन मानांकनानुसार, राजदीप बिस्वास ५७० गुणांसह पहिल्या क्रमांकावर असून राजवर्धन तिवारी व सात्विक शर्मा प्रत्येकी २७० गुणांसह संयुक्त दुसऱ्या स्थानावर आहेत. देवांशू चक्रवर्ती २२५ गुणांसह चौथ्या स्थानावर आहे.

राजवर्धन सध्या बार्शी येथील बार्शी टेबल टेनिस अकादमी येथे नियमित प्रशिक्षण घेत आहे. तसेच, त्याची उत्कृष्ट कामगिरी पाहता त्याची वर्ल्ड कॅडेट अजिंक्यपद स्पर्धेसाठी निवड झाली आहे, ही त्याच्यासाठी मोठी अभिमानाची बाब आहे.

राजवर्धनच्या या यशामागे त्यांचे मार्गदर्शक गणेश स्वामी यांचे महत्त्वपूर्ण मार्गदर्शन लाभले असून, त्यांच्या प्रशिक्षणामुळेच त्याने ही उंची गाठली आहे. भविष्यात तो आणखी मोठे यश मिळवेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

← Back to Homepage

बार्शीचा राजवर्धन तिवारी राज्य स्पर्धेत चमकला

Spread the love

बार्शी : सांगली येथील सुरज फाउंडेशन व सांगली जिल्हा टेबल टेनिस असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आणि महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस असोसिएशनच्या मान्यतेने आयोजित दुसरी महाराष्ट्र राज्य रँकिंग टेबल टेनिस स्पर्धा 27 ते 31 जुलै 2025 या कालावधीत अत्यंत उत्साहात पार पडली.

या स्पर्धेमध्ये 11, 13, 15, 17, 19 वर्षांखालील मुले-मुली व खुल्या गटातील पुरुष व महिला या विविध गटांमध्ये 750 हून अधिक खेळाडूंनी सहभाग घेतला, ही आजपर्यंतची सर्वाधिक नोंद ठरली.

या स्पर्धेत बार्शीच्या राजवर्धन तिवारी याने 11 वर्षांखालील मुलांच्या गटात उल्लेखनीय कामगिरी करत कांस्यपदक पटकावले. त्याच्या या यशामुळे बार्शीचे नाव राज्यस्तरावर उजळले असून त्याचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.

बक्षीस वितरण समारंभ दिनांक 31 जुलै रोजी पार पडला. प्रमुख पाहुणे म्हणून जनसुराज्य शक्तीचे प्रदेशाध्यक्ष समित कदम उपस्थित होते. त्यांच्या हस्ते विजेत्या खेळाडूंना गौरविण्यात आले.

समारंभाची सुरुवात महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस असोसिएशनचे अध्यक्ष प्रवीण लुंकड यांच्या प्रास्ताविकाने झाली. त्यांनी विद्यार्थ्यांना खेळामध्ये सातत्य ठेवण्याचा व स्पोर्ट्समध्ये करिअर घडविण्याचा सल्ला दिला.

प्रमुख पाहुणे समित कदम यांनी ‘खेलो इंडिया’ आणि ग्रँड मास्टर बुद्धिबळ स्पर्धा यांचा संदर्भ देत सांगली जिल्ह्यातील खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचावे असे आवाहन केले. तसेच सांगलीमध्ये स्पोर्ट्स क्षेत्रात भरीव पावले उचलली जातील, असेही आश्वासन त्यांनी दिले.

सूत्रसंचालन विनायक जोशी यांनी केले.

कार्यक्रमास बन्सी ओस्तवाल, बजरंग पाटील, भालचंद्र पाटील, उपाध्ये सर (उपाध्ये हायस्कूल), दीपक भांडवलकर (PI MIDC पोलीस), रवींद्र मिरजकर, सी. वसंतकुमार, रघुनाथ सातपुते, ॲड. राजेंद्र पाचोरे, दत्तात्रय मुळे, श्रीशैल मोटगी, डॉ. यशवंत तोरो (अध्यक्ष – नव कृष्णा व्हॅली स्कूल कमिटी) आदी मान्यवर उपस्थित होते. आभार प्रदर्शन सुरज फाउंडेशनच्या डायरेक्टर व नव कृष्णा व्हॅली स्कूलच्या मुख्याध्यापक संगीता पागनीस यांनी केले.

get_footer();