आवृत्ती पुणे
← Back to Homepage

बार्शीमध्ये कै संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ ६ मार्च रोजी बंदचे आवाहन

Spread the love

बार्शी : बीड जिल्ह्यातील मस्सा जोग चे सरंपच व बार्शी शहरातील सुपुत्र कै. संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येच्या निषेधार्थ गुरुवार, दि. ६ मार्च २०२५ रोजी बार्शी बंदचे आवाहन करण्यात आले आहे. या संदर्भात आज मस्सा जोग, सरपंच, बीड जिल्हा, आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी बार्शी शहर पोलीस स्टेशनला निवेदन सादर केले.

संतोष देशमुख यांच्या हत्येचे तपशील व CID कडून सादर केलेल्या चार्जशीटमधील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर जनमानसात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या हत्येच्या प्रकरणात वाल्मीक कराड याला मुख्य आरोपी म्हणून घोषित करण्यात आले आहे.

मात्र, या गुन्ह्यामागे धनंजय मुंडे यांचा हात असल्याचा आरोप करण्यात येत आहे. समाजातील अनेक नागरिकांचे मत आहे की, धनंजय मुंडे यांच्या पाठिंब्याशिवाय वाल्मीक कराड असे कृत्य करू शकत नाही.

यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी, तसेच गुन्हा घडण्याच्या दोन दिवस आधीपासून ते गुन्हा घडल्यानंतरच्या दहा दिवसांपर्यंत वाल्मीक कराड, धनंजय मुंडे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या कॉल डिटेल रेकॉर्ड्स (CDR) तपासण्यात याव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.

तसेच धनंजय मुंडे यांना या प्रकरणातील सहआरोपी घोषित करण्याचीही मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ आणि दोषींवर कठोर कारवाई व्हावी, या मागणीसाठी समस्त बार्शीकरांच्या वतीने ६ मार्च रोजी बार्शी बंदचे आवाहन केले आहे.

get_footer();