आवृत्ती पुणे
← Back to Homepage

बार्शी टेबल टेनिस अकॅडमीचा विभागीय स्पर्धेत उज्वल यश

Spread the love

बार्शी : पवन श्रीश्रीमाळ – बार्शी टेबल टेनिस अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी रायगड जिल्हा टेबल टेनिस संघटनेच्या वतीने आयोजित वेस्टर्न महाराष्ट्र आणि कोकण विभागीय टेबल टेनिस स्पर्धेत शानदार कामगिरी करत आपली ठसा उमटवला.

ही स्पर्धा दिनांक २६ व २७ एप्रिल २०२५ रोजी नवी मुंबई स्पोर्ट्स अँड समाज विकास मंडळ, पनवेल येथे पार पडली. या स्पर्धेत कोकण-पश्चिम महाराष्ट्र विभागातील विविध जिल्ह्यांतील सुमारे १५५ खेळाडूंनी सहभाग घेतला.

या सर्व गुणवंत खेळाडूंना बार्शी टेबल टेनिस अकॅडमीचे प्रशिक्षक गणेश स्वामी यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण दिले जात आहे. या यशस्वी कामगिरीबद्दल महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस संघटनेचे सरचिटणीस मा. यतीन टिपणीस सर यांच्या हस्ते सर्व खेळाडूंचा गौरव करण्यात आला.

हा गौरव क्षण संपूर्ण बार्शी टेबल टेनिस अकॅडमीसाठी अभिमानाचा ठरला. प्रशिक्षक गणेश स्वामी यांनी वेस्टर्न महाराष्ट्र आणि कोकण विभागीय टेबल टेनिस संघटनेचे अध्यक्ष व कोषाध्यक्ष मा. संजय कडू सर यांचे विशेष आभार मानले, ज्यांच्या पुढाकारामुळे या खेळाडूंना ही अमूल्य संधी मिळाली.

या दिमाखदार पदार्पणासह बार्शी टेबल टेनिस अकॅडमी प्रादेशिक टेबल टेनिस क्षेत्रात एक उदयोन्मुख शक्ती म्हणून पुढे येत आहे आणि नवोदित खेळाडूंना प्रेरणा देत आहे.


get_footer();