आवृत्ती पुणे
← Back to Homepage

बार्शी शहर पोलीस ठाण्यात २२ मे रोजी बेवारस वाहनांचा जाहीर लिलाव

Spread the love

२२ मे २०२५ रोजी सकाळी १० वाजता हा जाहीर लिलाव पोलीस ठाण्याच्या आवारात पार पडणार आहे. संबंधित वाहनांबाबतची सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आलेली असून, लिलावातून मिळणारी रक्कम शासनाच्या खात्यात जमा केली जाणार आहे.

लिलावात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या व्यवसायिकांनी २२ मे रोजी सकाळी ८ ते ९.३० या वेळेत पोलीस ठाण्यात उपस्थित राहून नोंदणी पूर्ण करावी. वेळेत नोंदणी न झाल्यास लिलावात सहभागी होता येणार नाही.

या लिलावाद्वारे बार्शी व परिसरातील अधिकृत स्क्रॅप व्यवसायिकांना व्यवसाय विस्ताराची संधी उपलब्ध झाली आहे. इच्छुकांनी सर्व आवश्यक कागदपत्रांसह वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे यांनी केले आहे.

get_footer();