आवृत्ती पुणे
← Back to Homepage

भूम तालुक्यात वंचित बहुजन आघाडीची नूतन कार्यकारिणी निवड २९ मे रोजी

Spread the love

भूम : वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटन अधिक बळकट करण्यासाठी जिल्हास्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले. ही बैठक मंगळवारी छत्रपती शिवाजी महाराज नगरपरिषद नाट्यगृह, धाराशिव येथे संपन्न झाली. या बैठकीला पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर प्रमुख उपस्थित होते.

बैठकीत धाराशिव जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याचा संघटनात्मक आढावा घेण्यात आला. भूम तालुक्यात वंचित बहुजन आघाडीची नवीन कार्यकारिणी निवड करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.

या निवडीसाठी ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी जिल्हा प्रसिद्धी प्रमुख मुकुंद लगाडे यांना निवड समिती प्रमुख म्हणून जबाबदारी सोपवली आहे. या बैठकीस मराठवाडा उपाध्यक्ष प्रवीण रणबागुल, निरीक्षक अविनाश भोसीकर, जिल्हा महासचिव प्रा. डॉ. शहाजी चंदनशिवे, डॉ. प्रणित डिकले, रामभाऊ गायकवाड, जिल्हा संघटक दत्तात्रय शिंदे, महिला आघाडी जिल्हा प्रमुख अनुराधा लोखंडे, नामदेव वाघमारे, विकास बनसोडे, सुधीर वाघमारे, बी.डी. शिंदे, ज्येष्ठ नेते मिलिंद रोकडे आणि समता सैनिक आदी मान्यवर उपस्थित होते.

नवीन कार्यकारिणीची निवड गुरुवार, दिनांक २९ मे २०२५ रोजी पार्डी रोडवरील शासकीय विश्रामगृह, भूम येथे होणार आहे. या निवड प्रक्रियेसाठी भूम तालुक्यातील सर्व वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि इच्छुकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.

get_footer();