आवृत्ती पुणे
← Back to Homepage

महाराष्ट्र विद्यालय, बार्शीचे NMMS परीक्षेत दैदिप्यमान यश

Spread the love

बार्शी : मंगळवार, दिनांक २४ फेब्रुवारी २०२६ रोजी जाहीर झालेल्या एन.एम.एम.एस. (राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकांसाठी शिष्यवृत्ती) परीक्षेच्या निकालात महाराष्ट्र विद्यालय, बार्शी या विद्यालयाने उल्लेखनीय यश संपादन केले आहे.

या परीक्षेसाठी विद्यालयातून एकूण २४६ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी तब्बल १८५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, विद्यालयाचा निकाल अत्यंत समाधानकारक लागला आहे. विशेष म्हणजे १०० पेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ८५ इतकी आहे.

विद्यार्थी चि. आदित्य दिपक म्हेत्रे याने १५३ गुण मिळवून विद्यालयातून प्रथम क्रमांक पटकावला आहे. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना सचिन देशमुख, सुरेश डिसले, संग्राम देशमुख व सुजित लोखंडे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

या उल्लेखनीय यशाबद्दल सर्व विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष मा. डॉ. बी. वाय. यादव साहेब, उपाध्यक्ष मा. नंदन जगदाळे साहेब, सचिव तथा शाळा समिती अध्यक्ष मा. पी. टी. पाटील साहेब, सहसचिव तथा शाळा समिती सदस्य मा. अरुण देबडवार सर, खजिनदार मा. जे. सी. शितोळे बापू, शाळा समिती सदस्या मा. डॉ. मीरायादव मॅडम, शाळा समिती सदस्य मा. शेळवणे बापू, संस्थेचे सर्व कार्यकारिणी सदस्य, संस्था सदस्य, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती के. डी. धावणे मॅडम, उपमुख्याध्यापक आर. बी. सपताळे सर, पर्यवेक्षिका एन. बी. साठे मॅडम, पर्यवेक्षक मदने के. जी. सर तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

विद्यालयाच्या या उज्ज्वल यशामुळे बार्शी तालुक्यात शैक्षणिक क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

get_footer();