आवृत्ती पुणे
← Back to Homepage

मानलेल्या बहिणीची छेड काढल्यावरून तरुणाला मारहाण करून केले जखमी

Spread the love

पुणे : आईबरोबर घरी पायी जात असताना टोळक्याने तरुणाला अडवून “माझ्या मानलेल्या बहिणीला का छेडतो?” असे म्हणत त्याला लाथाबुक्क्यांनी आणि दगडाने डोक्यात, पाठीवर, छातीवर व पोटात मारहाण करून गंभीर जखमी केले. बिबवेवाडी पोलिसांनी दोघांना अटक केली असून तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे.

हरीष विनोद कदम (वय २०, रा. लोअर इंदिरानगर, बिबवेवाडी) यांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी तुषार अमित तळेकर (वय १९, रा. लोअर इंदिरानगर, बिबवेवाडी) आणि साहिल संतोष बेंद्रे (वय १८, रा. लोअर इंदिरानगर, बिबवेवाडी) यांना अटक केली आहे. हा प्रकार बिबवेवाडी येथील महेश सोसायटी चौकातील आराधना स्वीट्ससमोर २२ मार्च रोजी दुपारी पावणेचार वाजता घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हरीष कदम हे आपल्या आई वैशाली कदम यांना आणण्यासाठी गेले होते. त्यांना कामावरून घेऊन हरीष पायी चालत असताना पावणेचार वाजण्याच्या सुमारास एका टोळक्याने त्यांना अडविले. एका अल्पवयीन मुलाने हरीष यांना “तू माझ्या मानलेल्या बहिणीला का छेडतोस?” असा प्रश्न विचारला.

हरीष काही बोलण्याआधीच साहिल बेंद्रे व इतरांनी त्यांना खाली पाडून काठ्यांनी मारहाण केली. तुषार तळेकर व इतरांनी लाथाबुक्क्यांनी व दगडाने हरीष यांच्या डोक्यात, पाठीवर, छातीवर व पोटात मारहाण करून जखमी केले. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार गायकवाड करीत आहेत.

get_footer();