आवृत्ती पुणे
← Back to Homepage

मैत्रिणीची छेड काढल्याने मित्राच्या डोक्यात दगड घालून खून

Spread the love

पुणे : जांभुळवाडी तलावावरील बंधाऱ्यावर रात्रीच्या वेळी फिरायला गेलेल्या मित्रांमध्ये, मैत्रिणीची छेड काढल्यावरून वाद निर्माण झाला. त्यातून एकाने आपल्या मित्राच्या डोक्यात आणि तोंडावर दगड मारून त्याचा खून केला.

रोहित नामदेव ढमाळ (वय २१, रा. योगमुद्रा बिल्डिंग, भूमकर वस्ती, नर्‍हे) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत दीपक सुखदेव बंडगर (वय २१, रा. अभिरुची परिसर, नर्‍हे) यांनी फिर्याद दिली आहे.

त्यावरून पोलिसांनी सुरज गणेश सूर्यवंशी (रा. गणेश पेठ) याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. खून करून पसार झालेल्या सुरज सूर्यवंशी याला आंबेगाव पोलिसांनी इंदापूर येथून अटक केली असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने यांनी सांगितले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी, फिर्यादी आणि रोहित ढमाळ हे तिघे एकमेकांचे मित्र आहेत. शनिवारी रात्री ते आंबेगाव येथील जांभुळवाडी तलावावरील बंधाऱ्यावर फिरायला गेले होते.

यावेळी त्यांच्यात मैत्रिणीची छेड काढल्यावरून वाद झाला. तेव्हा चिडून सुरज सूर्यवंशी याने रोहित ढमाळ याच्या डोक्यात आणि तोंडावर दगड मारला. त्यात रोहित ढमाळ याचा जागीच मृत्यू झाला.

या घटनेनंतर सुरज सूर्यवंशी हा पळून गेला होता. आंबेगाव पोलीस त्याचा शोध घेत असताना, तो इंदापूर येथे गेल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलीस पथकाने इंदापूरला जाऊन सुरज सूर्यवंशी याला पकडले. हा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रियंका गोरे करत आहेत.

get_footer();