आवृत्ती पुणे
← Back to Homepage

मैन्दरगे यांची चेअरमन, तर जाधवर यांची व्हाईस चेअरमनपदी निवड

Spread the love

भूम : दि. २ जून २०२५ रोजी व्यापारी नागरी सहकारी पतसंस्थेच्या चेअरमन व व्हाईस चेअरमन पदासाठी निवड प्रक्रिया संस्थेच्या मुख्य कार्यालयात A.R. ढोबळे मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या निवडीत जयेंद्र वसंतराव मैन्दरगे यांची चेअरमनपदी, तर अनिल नामदेवराव जाधवर यांची व्हाईस चेअरमनपदी निवड करण्यात आली.

या प्रसंगी जेष्ठ संचालक दिलीप गाढवे, बाळासाहेब तोडकर, नंदूशेठ नाईकवाडी, भासगे साहेब, मावळते चेअरमन आप्पासाहेब पोळ, तसेच नूतन संचालक भास्कर घुले उपस्थित होते.

संस्थेचे कर्मचारी अभय मनगिरे, विकास माळवदे व सचिव दीपक खराडे यांचीही उपस्थिती होती.

नवीन चेअरमन व व्हाईस चेअरमन यांचे उपस्थित सदस्यांनी अभिनंदन केले व त्यांच्या कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.

get_footer();