आवृत्ती पुणे
← Back to Homepage

राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी विविध महामंडळांच्या कामकाजाचा घेतला आढावा

Spread the love

पुणे : सामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी मंत्रालयात महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ, संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार विकास महामंडळ यांसह सामाजिक न्याय विभागाअंतर्गत येणाऱ्या विविध महामंडळांच्या कामकाजाचा आढावा घेतला.

या महामंडळांमार्फत संबंधित प्रवर्गाचा आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक विकास साधण्यासाठी विविध योजनांची अंमलबजावणी करण्यात येते. राज्यमंत्री मिसाळ यांनी यावेळी सांगितले की, “काळानुरूप योजना सुधारित करणे आवश्यक आहे.

लाभार्थ्यांच्या गरजा लक्षात घेऊन कर्जाची मर्यादा वाढवण्याबाबत कार्यवाही करण्यात यावी,” असे स्पष्ट निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. बैठकीदरम्यान महामंडळांमार्फत सुरू असलेल्या योजनांची सद्यस्थिती, अडचणी, लाभार्थ्यांचा प्रतिसाद आणि सुधारणा आवश्यक असलेल्या बाबींवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

get_footer();