आवृत्ती पुणे
← Back to Homepage

वेश्या व्यवसायाच्या आडून अंमली पदार्थांची तस्करी

Spread the love

पुणे : बुधवार पेठेतील वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांना व कुंटणखान्यात येणाऱ्या ग्राहकांना येथील एका आक्काच अंमली पदार्थांची विक्री करत असल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासात निष्पन्न झाली आहे. अंमली पदार्थ विरोधी पथकाने या आक्काला अटक केली आहे. बहिण-भाऊ मिळून हे रॅकेट चालवत असल्याचेही पोलीस तपासात उघड झाले आहे.

ज्योती सुनिल यादव ऊर्फ कट्टीमणी (वय ५०, रा. कात्रज) असे या आक्काचे नाव आहे.अंमली पदार्थ विरोधी पथकाने लक्ष्मी रोडवरील बुधवार पेठेतील बोळात अंमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या शरणप्पा कट्टीमणी (वय ३४, रा. कात्रज, मूळ रा. भापंर गल्ली, गुलबर्गा, कर्नाटक) याला पकडले होते.

त्याच्याकडून १२ लाख १२ हजार रुपये किमतीचे ५९ ग्रॅम मॅफेड्रोन (एमडी) जप्त करण्यात आले. त्याची चौकशी केली असता, त्याची बहिण ज्योती यादव हिच्याकडून विक्रीसाठी हे ड्रग्ज पुरवले जात असल्याचे निष्पन्न झाले.

ज्योती बुधवार पेठेत कुंटणखाना चालवत होती. मागील दोन वर्षांपासून ती वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांना व त्यांच्याकडे येणाऱ्या ग्राहकांना मॅफेड्रोन (एमडी) या अंमली पदार्थाची विक्री करत असल्याचेही समोर आले आहे. पोलिसांनी तिला अटक केली आहे.

ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीनकुमार नाईक, पोलीस उपनिरीक्षक अस्मिता लाड, पोलीस अंमलदार चेतन गायकवाड, संदीप जाधव, मयूर सूर्यवंशी, साहिल शेख, उदय राक्षे, संदीप शेळके, अझीम शेख, योगेश मांढरे, युवराज कांबळे, आझाद पाटील, नीलम पाटील, दिशा खेवलकर, रविंद्र रोकडे यांनी केली आहे.

get_footer();