आवृत्ती पुणे
← Back to Homepage

शुभम (पवन) श्रीश्रीमाळ यांची लिओ मल्टिपल डिस्ट्रिक्ट 3234 अध्यक्षपदी निवड

Spread the love

बार्शी : सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्याचे रहिवासी आणि लिओ क्लब ऑफ बार्शी टाउनचे संस्थापक अध्यक्ष लिओ. शुभम उर्फ पवन संजय श्रीश्रीमाळ यांची लायन्स इंटरनॅशनलच्या लिओ मल्टिपल डिस्ट्रिक्ट 3234 च्या 2025-26 या कार्यकाळासाठी अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. ही निवड लायन्स मल्टिपल कौन्सिल चेअरमन लायन विजयजी सारडा यांनी अधिकृतपणे घोषित केली.

महाराष्ट्रातील लिओ डिस्ट्रिक्ट D1 ला या पदाचा मान प्रथमच लाभला असून, पवन श्रीश्रीमाळ यांच्या रूपाने हे बहुमानाचे स्थान D1 ला मिळाले आहे.

या महत्त्वपूर्ण निवडीत डिस्ट्रिक्ट 3234 D2 चे पास्ट डिस्ट्रिक्ट गव्हर्नर लायन राज मुच्छाल, D1 चे पास्ट डिस्ट्रिक्ट गव्हर्नर लायन ॲड. एम. के. पाटील, D1 चे नूतन डिस्ट्रिक्ट गव्हर्नर लायन डॉ. वीरेंद्र चिखले, लायन अतुल सोनीग्रा, लायन जगदीश पुरोहित, लिओ डिस्ट्रिक्ट D1 चेअरपर्सन ला.ॲड. विकास जाधव, क्लबचे ॲडव्हायझर ला. प्रकाश फुरडे आणि लायन्स क्लब ऑफ बार्शी टाउनचे प्रेसिडेंट ला. महावीर कदम यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.

शुभम यांचा लिओ प्रवास 2021-22 मध्ये लिओ क्लब ऑफ बार्शी टाउनच्या स्थापनेसह सुरू झाला.

त्यांची संस्थापक अध्यक्ष (चार्टर प्रेसिडेंट) म्हणून निवड झाली होती.

त्यांच्या प्रभावी नेतृत्वगुणांमुळे 2022-23 मध्ये त्यांना लिओ डिस्ट्रिक्ट 3234 D1 चे डिस्ट्रिक्ट अध्यक्ष म्हणून जबाबदारी देण्यात आली.

यानंतर 2023 मध्ये त्यांनी लिओ मल्टिपल डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी, तर 2024 मध्ये व्हाईस प्रेसिडेंट ही पदे अत्यंत यशस्वीरित्या पार पाडली.

आता 2025-26 साठी लिओ मल्टिपल प्रेसिडेंट म्हणून निवड होणे हे त्यांच्या सातत्यपूर्ण नेतृत्वगुणांचे फलित मानले जात आहे.

लिओ मल्टिपल डिस्ट्रिक्ट 3234 मध्ये D1, D2, H1 आणि H2 हे चार प्रमुख डिस्ट्रिक्ट्स कार्यरत असून, मुंबई वगळता महाराष्ट्रातील उर्वरित जिल्ह्यांतील लिओ क्लब्स या मल्टिपल अंतर्गत कार्य करतात.

या निवडीनंतर संपूर्ण मल्टिपलमधून शुभम उर्फ पवन यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात लिओ चळवळीला नवसंजीवनी मिळेल, असा विश्वास सर्व स्तरांतून व्यक्त होत आहे.

पवन यांच्यासोबत लिओ मल्टिपल व्हाइस प्रेसिडेंट म्हणून H1 मधील नागपूर ॲचीवर्स क्लबचे लिओ-लायन भूषण अवसारे, सचिव म्हणून H2 मधील जालना डायमंड क्लबचे लिओ-ला. जतिन अग्रवाल आणि कोषाध्यक्ष म्हणून D2 मधील पुणे फिनिक्स क्लबच्या लिओ सानिका कुलकर्णी या वर्षी कार्य भूषवणार आहेत.

get_footer();