आवृत्ती पुणे
← Back to Homepage

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचा सुवर्ण महोत्सव सोहळा उत्साहात संपन्न

Spread the love

पुणे : श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, धानोरी (पुणे) या मंदिराचा ५० वा वर्धापन दिन नुकताच भक्तिभावाने साजरा करण्यात आला. सुवर्ण महोत्सव वर्षानिमित्ताने वर्षभर विविध आध्यात्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. या निमित्ताने झी टॉकीज प्रस्तुत वारी विशेष कार्यक्रमाचे तीन दिवसांचे चित्रीकरण मोठ्या भक्तिभावाने पार पडले.

दिनांक १२, १३ व १४ जून २०२५ रोजी राजकमल बँक्वेट हॉल, धानोरी येथे झी टॉकीजच्या संपूर्ण टीमने अत्यंत मेहनतीने वारी विशेष कार्यक्रमाचे शूटिंग पूर्ण केले. कार्यक्रमात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या हरीपाठावर आधारित कीर्तनाचे निरूपण प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. प्रकाश महाराज साठे यांनी आपल्या सुमधुर वाणीने केले.

मनुष्य जीवनात हरीपाठाचे स्थान किती महत्वाचे आहे, हे महाराजांनी आपल्या विनोदी आणि प्रभावी शैलीत श्रोत्यांपुढे उलगडले. “राम कृष्ण हरी… असे मुखाने म्हणत राहणे म्हणजेच हरीपाठ करणे होय” असा उपदेश त्यांनी केला. उपस्थित सर्व भाविकांनी दररोज हरीपाठ करण्याची प्रतिज्ञा घेतली.

झी टॉकीजवर ‘गजर कीर्तनाचा, सोहळा आनंदाचा’ सदर कार्यक्रमाचे प्रक्षेपण झी टॉकीज वाहिनीवर ‘गजर कीर्तनाचा, सोहळा आनंदाचा’ या मालिकेअंतर्गत १७ जून २०२५ पासून दररोज सकाळी ७.३० ते ९.३० या वेळेत होणार आहे.

या संपूर्ण कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री ज्ञानेश्वर भजनी मंडळ तसेच धानोरी गावचे ग्रामस्थ, पुरुष व महिला मंडळ यांनी मन:पूर्वक परिश्रम घेतले. तीन दिवस चाललेल्या या चित्रीकरणादरम्यान गावात उत्सवी आणि भक्तिमय वातावरण अनुभवायला मिळाले.

get_footer();