आवृत्ती पुणे
← Back to Homepage

सस्ती अदालत भूम येथे 9 मे रोजी

Spread the love

भूम : शेतरस्ते व पाणंद रस्त्यांवरील अतिक्रमणाबाबत नागरिकांकडून वाढत्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर येथील मा. विभागीय आयुक्त यांच्या दिनांक 16 एप्रिल 2025 रोजीच्या परिपत्रकानुसार, अशा प्रकरणांवर चर्चा करून निर्णय घेण्यासाठी दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शुक्रवारी “सस्ती अदालत” आयोजित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

या अनुषंगाने मा. जिल्हाधिकारी, धाराशिव यांनी 29 एप्रिल 2025 रोजी भूम तालुक्यासाठी सस्ती अदालत घेण्याचे आदेश दिले आहेत. यानुसार भूम तहसील कार्यालयात दि. 09 मे 2025 रोजी (शुक्रवार), सकाळी 10:00 वाजता, तहसील कार्यालय सभागृह, भूम येथे “सस्ती अदालत” आयोजित करण्यात येत आहे.

या अदालतीमध्ये शेतरस्ते व पाणंद रस्त्यांवरील अतिक्रमणासंबंधी पूर्वी अर्ज सादर केलेल्या अर्जदार व संबंधित गैरअर्जदार यांच्यात प्रत्यक्ष संवाद साधून, समुपदेशनाद्वारे व समजुतीने निर्णय घेण्यात येणार आहे.

त्यामुळे संबंधितांनी अदालतीस उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सस्ती अदालतीसाठी गठित तालुका स्तरीय समितीची रचना पुढीलप्रमाणे आहे : तहसीलदार – अध्यक्ष, गट विकास अधिकारी – सह-अध्यक्ष, उप अधीक्षक, भूमिअभिलेख – सदस्य, उप अभियंता, बांधकाम विभाग (जि. प.) – सदस्य, वन परिक्षेत्र अधिकारी – सदस्य, पोलीस निरीक्षक / उप निरीक्षक – सदस्य, नायब तहसीलदार (महसूल) – सचिव तहसीलदार, भूम यांच्यावतीने नागरिक व शेतकरी बांधवांना विनंती करण्यात येते की, त्यांनी सदर अदालतीस उपस्थित राहून त्यांचे प्रकरण समजुतीने निकाली काढून घ्यावे.

get_footer();