आवृत्ती पुणे
← Back to Homepage

सूर्यदत्त कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये ‘शिवोत्सव’ उत्साहात साजरा

Spread the love

पुणे : बावधन येथील सूर्यदत्त कॉलेज ऑफ फार्मसी, हेल्थकेअर अँड रिसर्च (SCPHR) मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या दैदीप्यमान कार्याचे महत्त्व तरुण पिढीला पटवून देण्यासाठी, शिवजयंतीचे औचित्य साधून ‘शिवोत्सव’ अत्यंत उत्साहात आणि भक्तीभावाने साजरा करण्यात आला. ‘स्वराज्याची ज्योत पुन्हा प्रज्वलित करण्याचा संकल्प’ (Reigniting the Spark of Swarajya) या मुख्य संकल्पनेवर आधारित या विशेष सप्ताहाचे आयोजन महाविद्यालयाच्या सांस्कृतिक समितीमार्फत करण्यात आले होते.

कार्यक्रमाची अधिकृत सुरुवात सूर्यदत्त समूहाच्या सहाय्यक उपाध्यक्ष सौ. स्नेहल नवलाखा यांच्या हस्ते शिवआरती आणि दीपप्रज्वलन करून करण्यात आली. यावेळी बन्सी रत्न ऑडिटोरियम आणि महाविद्यालय परिसरात छत्रपती शिवरायांचे राजेशाही स्वागत करण्यात आले.

विद्यार्थी आणि प्राध्यापकांनी दिलेल्या ‘शिवगर्जना’ घोषणांनी संपूर्ण परिसर देशभक्तीने दुमदुमून गेला होता. महोत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजे विद्यार्थ्यांनी सादर केलेले प्रेरणादायी पोवाडे आणि ओघवती भाषणे. ‘वीररस पोवाडा’ सादरीकरणातून मराठा साम्राज्याचा गौरवशाली इतिहास आणि शौर्यगाथा जिवंत करण्यात आल्या.

विशेषतः, सुप्रसिद्ध व्याख्याते नितीन बांगुडे पाटील यांचे डिजिटल ‘शिव व्याख्यान’ प्रक्षेपित करण्यात आले, ज्यातून विद्यार्थ्यांना महाराजांच्या व्यवस्थापन कौशल्याची, दूरदृष्टीची आणि अष्टपैलू नेतृत्वाची नवी दृष्टी मिळाली. याप्रसंगी ढोल-ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली.

पारंपरिक नऊवारी साडी, फेटा आणि मराठमोळ्या पेहरावात नटलेल्या विद्यार्थ्यांनी यात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. यानिमित्त ‘बेस्ट ट्रेडिशनल ड्रेपरी’ स्पर्धा आणि शिवरायांच्या जीवनावर आधारित कलात्मक पोस्टर प्रदर्शनाचेही आयोजन करण्यात आले होते.

स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. हा संपूर्ण सोहळा महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सारिका झांबड यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पडला. महोत्सवाचा समारोप दिमाखदार ‘ग्रँड फिनाले’ नृत्याने आणि छत्रपती शिवरायांच्या जाज्वल्य विचारांच्या जपणुकीच्या सामूहिक निर्धाराने झाला.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम आणि स्वाभिमानाची भावना जागृत झाली असून, शिवरायांनी घालून दिलेला शौर्य आणि सदाचाराचा वारसा आपल्या व्यावसायिक आयुष्यात पुढे नेण्याचा संकल्प यावेळी विद्यार्थ्यांनी केला. आभार प्रदर्शनाने या अविस्मरणीय सोहळ्याची सांगता झाली.

← Back to Homepage

सूर्यदत्त कॉलेज ऑफ फार्मसीला महाराष्ट्रात १२ वे स्थान

Spread the love

पुणे : इंडियन इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्कने (आयआयआरएफ) नुकत्याच प्रकाशित केलेल्या क्रमवारीत सूर्यदत्त कॉलेज ऑफ फार्मसी, हेल्थकेअर अँड रिसर्चला (एससीपीएचआर) महाराष्ट्रात १२ वे, तर पश्चिम विभागात १८ वे स्थान प्राप्त झाले आहे. देशातील फार्मसी महाविद्यालयांच्या यादीत ‘सूर्यदत्त’ने चमकदार कामगिरी करत या क्रमवारीत देशात ७२ वे स्थान मिळवले आहे.

उद्योग जगतातील तज्ज्ञांकडून या क्रमवारीत सूक्ष्मपणे मूल्यांकन करण्यात येते. २०२४ या वर्षाची क्रमवारी एज्युकेशन पोस्ट मासिकात नुकतीच जाहीर झाली. अध्यापन-अध्ययन व स्रोत, संशोधन, भविष्यवेधी मार्गदर्शन, रिटर्न व इन्व्हेस्टमेंट आणि बाह्यधारणा व आंतरराष्ट्रीय दृष्टिकोन या पाच मुद्यांवर सर्वेक्षण करून ही क्रमवारी तयार केली जाते.

या क्रमवारीने सूर्यदत्तच्या समर्पित भावनेचा आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा गौरव झाला आहे. सूर्यदत्त कॉलेज ऑफ फार्मसी मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ लोणेरेच्या मान्यतेने बॅचलर ऑफ फार्मसी (बी. फार्म) आणि महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाच्या मान्यतेने डिप्लोमा इन फार्मसी (डी. फार्म) हे दोन अभ्यासक्रम चालवले जातात.

उत्साही विद्यार्थ्यांची या क्षेत्रातील स्वप्ने पूर्ण व्हावीत आणि त्यांना एक चांगले करिअर घडविता यावे, यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या सूर्यदत्तसाठी ही मान्यता प्रोत्साहन आहे. सद्यस्थितीत आरोग्य क्षेत्राच्या गरजा लक्षात घेऊन इथे प्रात्यक्षिक व पाठ्यपुस्तकातील ज्ञान दिले जाते.

सूर्यदत्त कॉलेज फार्मसी, हेल्थकेअर अँड रिसर्च (एससीपीएचआर) औषधनिर्माणशास्त्राच्या क्षेत्रात उच्च दर्जाचे शिक्षण आणि प्रशिक्षण देण्यास वचनबद्ध आहे. विद्यार्थ्यांना आरोग्य सेवा उद्योगातील विविध भूमिकांसाठी तयार करण्याचे ध्येय संस्थेचे आहे.

महाविद्यालयाने औषधनिर्माण पद्धतींना सुधारण्यास आणि रुग्णांच्या देखभालीत सुधारणा करण्यासाठी अभिनव संशोधनाला नेहमीच प्रोत्साहन दिले आहे.आधुनिक सुविधा आणि चांगल्या प्रकारे सुसज्ज प्रयोगशाळांसह, ‘एससीपीएचआर’ विद्यार्थ्यांना सिद्धांतात्मक ज्ञान आणि व्यावहारिक कौशल्ये विकसित करण्यासाठी प्रोत्साहित करते.

कॅम्पसमध्ये आधुनिक वर्गखोल्या आणि प्रगत सुविधा असल्याने विद्यार्थ्यांना सतत विकसित होणाऱ्या औषधनिर्माण क्षेत्रातील करिअरसाठी मदत होते. सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांनी नामांकित क्रमवारीतील स्थानाबद्दल फार्मसी महाविद्यालयाच्या सर्व टीमचे विशेष अभिनंदन केले.

अतिशय महत्वाच्या अशा या क्रमवारीत ‘एससीपीएचआर’ला स्थान मिळाल्याचा आनंद आहे. यातून महाविद्यालयाची उत्कृष्टतेबाबत असलेली समर्पित भावना आणि उच्च प्रतीचे फार्मसी प्रोफेशनल घडविण्याचे ध्येय अधोरेखित होते.

महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचा आलेख असाच उंचवत राहावा. तुम्हाला आवश्यक त्या सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यास आम्ही कटिबद्ध आहोत, असे प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांनी नमूद केले.

get_footer();