आवृत्ती पुणे
← Back to Homepage

स्पर्धा परीक्षेची तयारी करणार्‍या तरुणाने उचलले टोकाचे पाऊल

Spread the love

पुणे : स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या एका तरुणाने टोकाचे पाऊल उचलून आपले जीवन संपविले आहे. नवी पेठेतील घरामध्ये शुक्रवारी दुपारी हा प्रकार समोर आला. तरुणाने नैराश्यातून हे पाऊल उचलल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

सागर सुभाष पवार (वय २६, रा. मेहेकर, जि. बुलढाणा) असे या तरुणाचे नाव आहे. सागर मूळचा बुलढाणा जिल्ह्यातील असून तो गेल्या ४ वर्षांपासून पुण्यात राहात होता. तो स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता.

नवी पेठेत तो मित्रांबरोबर रहात होता. शुक्रवारी दुपारी त्याच्या खोलीचा दरवाजा बंद होता. त्याच्या मित्रांनी दरवाजा वाजविला; मात्र त्याने प्रतिसाद दिला नाही. मित्रांनी या घटनेची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला दिली. त्यानंतर पोलिसांनी दरवाजा तोडला. तेव्हा सागरने गळफास घेतल्याचे आढळून आले.

get_footer();