आवृत्ती पुणे
← Back to Homepage

स्वामिनी संस्थेच्यावतीने ‘आदर्श मुख्याध्यापिका’ म्हणून सन्मान

Spread the love

बार्शी : भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने सांगितले आहे, “कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन” म्हणजेच फळाची अपेक्षा न करता आपले कर्तव्य प्रामाणिकपणे करत राहावे. बार्शी येथील के.एल.ई. सोसायटी, बेळगावी संचलित सिल्व्हर ज्युबिली बालक मंदिर विभागाच्या कर्तव्यनिष्ठ, संवेदनशील व विद्यार्थीप्रिय मुख्याध्यापिका दिपाली नितीन गोरे यांचे कार्य या श्लोकाचे मूर्तिमंत उदाहरण ठरत आहे.

प्राथमिक शिक्षिका म्हणून शिक्षण सेवेत प्रवेश करून मुख्याध्यापिका पदापर्यंतचा त्यांचा प्रेरणादायी व यशस्वी प्रवास निश्चितच अनुकरणीय आहे. त्यांच्या गुणवत्तापूर्ण, सातत्यपूर्ण व प्रेरक कार्याची दखल घेत स्वामिनी बहुउद्देशीय सामाजिक संस्था, महाराष्ट्र यांच्यावतीने त्यांना ‘आदर्श मुख्याध्यापिका’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

हा सन्मान संस्थेच्या सचिव नेहा विक्रांत पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.गेल्या पाच वर्षांत बालक मंदिर विभागातील चिमुकल्यांना विविध शैक्षणिक व संस्कारक्षम उपक्रमांच्या माध्यमातून घडविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य दिपाली गोरे यांनी केले आहे.

शाळेची पहिली पायरी असलेले बालक मंदिर हे विद्यार्थ्यांचे दुसरे घर व्हावे, यासाठी त्यांनी आपुलकीपूर्ण, प्रेमळ व शिस्तप्रिय वातावरण निर्माण केले. विद्यार्थ्यांशी जिव्हाळ्याचे नाते जपत शिक्षणासोबतच संस्कारांवर त्यांनी विशेष भर दिला आहे.

नर्सरीपासून मोठ्या गटापर्यंत महापुरुषांच्या जयंती व पुण्यतिथी नियमितपणे साजऱ्या करून त्यांच्या विचारांचे संस्कार विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्याचे दूरदृष्टीपूर्ण कार्य त्यांनी केले. लहान वयातच राष्ट्रभक्ती, सामाजिक जाणीव व नैतिक मूल्यांची भक्कम पायाभरणी करण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न विशेष उल्लेखनीय आहे.

वर्षभरातील विविध सण, परंपरा व त्यांचे शैक्षणिक महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यासाठी त्यांनी अभिनव व कल्पक उपक्रम राबविले. तसेच पारंपरिक व लोप पावत चाललेले जुने मैदानी खेळ विद्यार्थ्यांना शिकवून शारीरिक विकासासोबतच सांस्कृतिक वारसा जपण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले.

या उपक्रमांचा आदर्श घेऊन बार्शी शहर व तालुक्यातील अनेक शाळांनी सकारात्मक बदल घडवून आणले आहेत. सामाजिक बांधिलकी जपत अतिवृष्टी व ढगफुटीमुळे बाधित झालेल्या मांडेगाव (ता. बार्शी) येथील पूरग्रस्त कुटुंबांना धान्य स्वरूपात मदत करण्यात आली.

तसेच अंगणवाडीतील मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करून ‘मदत नव्हे, कर्तव्य’ या भावनेतून समाजाप्रती आपली जबाबदारी त्यांनी पार पाडली. या स्तुत्य कार्यामुळे सिल्व्हर ज्युबिली बालक मंदिर विभागाचे नाव सोलापूर जिल्ह्यात सन्मानाने घेतले जाऊ लागले आहे.

के.एल.ई. सोसायटीच्या सर्वेसर्वा वर्षाताई ठोंबरे-झाडबुके तसेच माजी मुख्याध्यापक प्रशांत कोल्हे सर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी शैक्षणिक सेवा अधिक प्रभावीपणे पुढे नेली आहे. कला अविष्कार अकॅडमीच्या माध्यमातून कराटे, नृत्य, रायफल शूटिंग, तलवारबाजी अशा विविध कला व क्रीडा प्रकारांतून अनेक गुणवंत विद्यार्थ्यांना घडविण्यात त्यांचे मोलाचे योगदान आहे.

उपक्रमशीलता, विद्यार्थीप्रिय स्वभाव व पालकांचा विश्वास या त्रिसूत्रीवर आधारित कार्यशैलीमुळे दिपाली नितीन गोरे मॅडम आज ‘Dipali Gore – Ideal Headmaster’ म्हणून ओळखल्या जात आहेत. शिक्षण, संस्कार व समाजसेवा यांचा सुंदर संगम साधणाऱ्या त्यांच्या कार्यामुळे त्या बार्शीतील शिक्षण क्षेत्रातील एक आदर्श व प्रेरणास्थान ठरत आहेत. यावेळी पुनम वासकर, भारती चोपडे, तेजश्री स्वामी, दिपाली कळसकर आदी उपस्थित होते.

get_footer();