आवृत्ती पुणे
← Back to Homepage

हिंजवडी-माण आयटी पार्क परिसरातील समस्यांवर PMRDA ची बैठक

Spread the love

पुणे : हिंजवडी-माण आयटी पार्क परिसरात पावसामुळे निर्माण झालेल्या नैसर्गिक आपत्तींमुळे नागरिक व कंपन्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. याचा गांभीर्याने विचार करत पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (PMRDA) महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी एक विशेष बैठक पार पडली. या बैठकीत लोकप्रतिनिधी, हिंजवडी, माण व मारुंजी येथील सरपंच, पदाधिकारी, ग्रामस्थ तसेच विविध शासकीय यंत्रणांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी उपस्थित सर्व विभागीय अधिकाऱ्यांना समन्वयाने काम करण्याच्या सूचना दिल्या. “PMRDA ही यंत्रणा नागरिकांच्या जीवनमानात सुधारणा घडवून आणण्यासाठी आणि हिंजवडी-माण-मारुंजी परिसराचा विकास गतीमान करण्यासाठी कटिबद्ध आहे,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.

या बैठकीद्वारे स्थानिक नागरिकांच्या तक्रारींना सकारात्मक प्रतिसाद देत PMRDA प्रशासनाने विविध पातळ्यांवर तातडीची कृती करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. येत्या काळात या उपाययोजना प्रत्यक्षात राबवल्या गेल्यास परिसरातील नागरिकांना निश्चितच दिलासा मिळेल.

get_footer();