आवृत्ती पुणे
← Back to Homepage

३ कोटी ६० लाखांचा गंडा घालणारा आंतरराष्ट्रीय महाठग गजाआड

Spread the love

पुणे : मॅट्रिमोनियल साईटवरून महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिचा व्यवसाय आंतरराष्ट्रीय पातळीवर करण्याचा प्रयत्न करत असल्याचे तो सांगत होता. ३ कोटी ६० लाख रुपये घेऊन, कॅन्सरने मृत्यू झाल्याचे भासवणाऱ्या आंतरराष्ट्रीय महाठगाला सायबर पोलिसांनी गजाआड केले आहे. त्याने शादी डॉट कॉमवर फेक प्रोफाईल तयार करून तब्बल ३,१९४ महिलांना मॅसेज करून संपर्क केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्याने या महिलेसारख्या अनेक महिलांची फसवणूक केली असल्याचा पोलिसांना संशय आहे.

अभिषेक शुक्ला (वय ४२, मूळ रा. लखनौ, सध्या रा. पर्थ, ऑस्ट्रेलिया) असे या महाठगाचे नाव आहे.

मूळची दिल्लीतील आणि सध्या पुण्यात खराडी येथे राहणाऱ्या एका महिलेला या अनिवासी भारतीयाने डॉ. रोहित ओबेरॉय असे नाव धारण करून फसवले. शादी डॉट कॉमवर फेक प्रोफाईल तयार करून २०२३ मध्ये मॅसेज करून ओळख वाढवली. त्यानंतर लग्नाचे आमिष दाखवून तिचा विश्वास संपादन केला.

पीडित महिलेला पहिल्या पतीपासून घटस्फोट झाल्याने ५ कोटींची पोटगी मिळाली होती. हे या महाठगास समजले. त्याने तिला लग्नाची मागणी घातली. ही महिला लहान मुलांसाठी Mindfulness and Spirituality प्रोग्राम घेऊन त्याद्वारे व्यवसाय करत होती.

या संधीचा गैरफायदा घेत त्याने तिचा व्यवसाय आंतरराष्ट्रीय स्तरावर नेऊन त्यासाठी फंडिंग मिळवून देतो, असा बनाव करून इव्हॉन हॅंदयानी, विन्सेंट कुआण हे सिंगापूरचे असल्याचे सांगून त्यांच्याशी संगनमत करून फिर्यादी महिलेला सिटी बँक सिंगापूर व भारतातील काही बँकांमध्ये वेळोवेळी ४ कोटी ६० लाख १८ हजार ५४० रुपये भरण्यास भाग पाडले.

कालांतराने डॉ. रोहित ओबेरॉय हा ऑस्ट्रेलियाला गेला आणि त्याने पीडितेशी बोलण्यास टाळाटाळ करत तोंडाचा कॅन्सर झाल्याचे भासवून तब्येत सतत खालावत असल्याचे सांगून कायमचा संपर्क बंद केला. सप्टेंबर २०२४ मध्ये त्याचा पार्टनर विन्सेंट कुआण याने पीडितेला एक ई-मेल करून त्यात डॉ. ओबेरॉयचा मृत्यू झाल्याचा संदेश दिला.

फिर्यादीच्या मैत्रिणीने हा फ्रॉड असू शकतो असे सांगितल्यावर तिने याची पडताळणी केली. खात्री झाल्यावर नोव्हेंबर २०२४ मध्ये तिने सायबर पोलिसांकडे फसवणुकीची तक्रार दाखल केली.

सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल करून वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वप्नाली शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास केला. तांत्रिक विश्लेषणातून हे निष्पन्न झाले की, फिर्यादीला फसवणारा “डॉ. रोहित ओबेरॉय” नसून त्याचे खरे नाव अभिषेक शुक्ला असून तो सध्या पर्थ (ऑस्ट्रेलिया) येथे राहतो.

get_footer();