आवृत्ती पुणे

महाराष्ट्र विद्यालय, बार्शीचे NMMS परीक्षेत दैदिप्यमान यश

२४६ पैकी १८५ विद्यार्थी उत्तीर्ण : आदित्य म्हेत्रे १५३ गुणांसह प्रथम, ८५ विद्यार्थ्यांना १०० पेक्षा अधिक गुण महाराष्ट्र न्युज नेटवर्क बार्शी : मंगळवार, दिनांक २४ फेब्रुवारी २०२६ रोजी जाहीर झालेल्या एन.एम.एम.एस. (राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकांसाठी शिष्यवृत्ती) परीक्षेच्या निकालात महाराष्ट्र विद्यालय, बार्शी या विद्यालयाने उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या परीक्षेसाठी विद्यालयातून एकूण २४६ विद्यार्थी प्रविष्ट … Read more

सूर्यदत्ततर्फे प्रेमावतार मैत्रीबोध दादाश्रींना ‘ग्लोबल लाईफ टाइम अचिव्हमेंट’ व ‘ग्लोबल पीस ॲम्बेसेडर’ पुरस्कार

‘सूर्यरत्न – द मॉडर्न सेंट ऑफ इंडिया’ उपाधीनेही गौरव महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : प्रेम, मैत्री, करुणा आणि जागतिक शांततेचा संदेश देत मानवी मूल्यांची जोपासना करणारे प्रेमावतार मैत्रीबोध दादाश्री महाराज यांना सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट, पुणे यांच्या वतीने वर्ष २०२६ चे ‘Suryadatta Global Life Time Achievement Award’ आणि ‘Global Peace Ambassador Award – 2026’ प्रदान … Read more

बारावीच्या विद्यार्थ्यावर कोयत्याने वार

कोथरुडमधील महाविद्यालयाच्या परिसरातील घटना : तीन अल्पवयीन ताब्यात महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : बारावीची परीक्षा देऊन बाहेर पडलेल्या एका विद्यार्थ्यावर जुन्या भांडणाच्या कारणावरून तिघा अल्पवयीन मुलांनी कोयत्याने वार करून जखमी केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी कर्वेनगर येथे राहणाऱ्या एका १७ वर्षांच्या मुलाने कोथरुड पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले … Read more

मार्केट यार्ड गुळ-भुसार विभागाचा २५ फेब्रुवारीचा लाक्षणिक बंद स्थगित

२६ फेब्रुवारी रोजी संयुक्त बैठक : तोडगा न निघाल्यास पुढील आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : मार्केट यार्डातील गुळ-भुसार विभागातील सभासदांच्या प्रलंबित मागण्या व वाढत्या समस्यांबाबत तोडगा काढण्यासाठी पणन संचालकांनी संयुक्त बैठक आयोजित केल्याने २५ फेब्रुवारी रोजी प्रस्तावित लाक्षणिक बंद स्थगित करण्यात आला आहे. मार्केट यार्डातील गुळ-भुसार विभागातील सभासदांच्या विविध प्रलंबित मागण्या तसेच वाढत्या … Read more

बार्शीतील बारंगुळे प्लॉट येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर

Ashok Saykar (DYSP) यांनी बार्शीकरांना शांतता, संयम व कायद्याला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. अफवांवर विश्वास ठेवू नका. प्रशासनास सहकार्य करा. सामाजिक सलोखा जपा. महाराष्ट्र न्यूज नेटवर्क

लोणार तालुक्यात शिवमूर्तीची विटंबना : मोक्काची मागणी

बार्शीत युवासेनेचे आंदोलन : आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी महाराष्ट्र न्युज नेटवर्क बार्शी : लोणार तालुक्यातील चिखला गावात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवारायांची मूर्ती बसविण्यात आली होती. या मूर्तीला विरोध करत काही समाजकंटकांनी मूर्तीची विटंबना करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. याचवेळी दगडफेक करत दंगलसदृश परिस्थिती निर्माण करण्यात आली. तसेच काही महिलांवर हल्ला करून त्यांना … Read more

लाच घेताना सहायक पोलीस उपनिरीक्षकाला अटक

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची पौड पोलीस ठाण्यात कारवाई महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : दाखल झालेल्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी व गाडी जप्त न करण्यासाठी १ लाख रुपयांची लाच मागून तडजोडीनंतर ३५ हजार रुपये स्वीकारताना पौड पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस उपनिरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून पकडले. सचिन बाळासाहेब शिंदे (वय ४५, रा. ग्रीन फ्लोरेन्सिया सोसायटी, सुसगाव, ता. … Read more

गुंतवणूकदारांची फसवणूक करून ३ वर्षे फरार असलेला आरोपी जेरबंद

चंदननगर पोलिसांची कामगिरी : ९० गुंतवणूकदारांना ३ कोटी ३९ लाखांचा गंडा महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : शेअर मार्केटमधील गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून ९० गुंतवणूकदारांची ३ कोटी ३९ लाख १२ हजार ६३७ रुपयांची फसवणूक करून फरार झालेल्या कंपनी संचालकाला पकडण्यात चंदननगर पोलिसांना ३ वर्षांनंतर यश आले. भारत सोपान पठारे (वय ३०, रा. नाऊरगाव, … Read more

सोने मुल्यांकनकरने संगनमत करुन बँकेला घातला कोट्यावधीचा गंडा

बनावट सोन्याचे दागिने खरे असल्याचे सांगून ४१ जणांना सोने तारण कर्ज देऊन बँकेची फसवणूक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : कल्याण जनता सहकारी बँकेने नेमलेल्या गोल्ड व्हॅल्युअरने संगनमत करून ४४ जणांना सोनेतारण कर्जासाठी बनावट सोन्याचे दागिने खरे असल्याचा अहवाल दिला. बँकेने सोनेतारणावर कर्ज दिल्यानंतर गोल्ड व्हॅल्युअर फरार झाला असून कल्याण जनता सहकारी बँकेला तब्बल १ कोटी … Read more