आवृत्ती पुणे

दहशत माजवणाऱ्या गुन्हेगारावर स्थानबद्धतेची कारवाई

एम. पी. डी. ए कायद्यान्वये 24 वी स्थानबद्धतेची कारवाई महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : शहरात खडक पोलिस स्टेशन हद्दीमधला अट्टल गुन्हेगार अरबाज उर्फ बबन शेख, वय 24 वर्षे, राहणार भवानी पेठ याच्यावर नागपूरमध्ये 1 वर्षाच्या स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे. अरबाज शेख हा अभिलेखावरील सराईत गुन्हेगार आहे. शेख आणि त्याच्या साथीदारांनी खडक, समर्थ, लष्कर पोलिस … Read more

वाहनचालकांवर खडक पोलिस ठाण्याची धडक कारवाई : 39 हजारांचा दंड वसूल

महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : खडक पोलिस स्टेशन हद्दीत बेशिस्त वाहनचालकांवर कारवाईची मोहिम राबवण्यात आली. बेशिस्त वाहनचालकांविरूद्ध कारवाई करत साडे एकोणचाळीस हजार रूपयांचा दंड वसूल केला. या कारवाईत विना परवाना वाहनधारक, विमा नसलेली वाहने, ट्रिपल सीट वाहने, मोबाईल फोनवर बोलणारे लोक, सिग्नल मोडणारे वाहन चालक, अल्पवयीन मुले यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. या कारवाई दरम्यान … Read more

राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी मंत्रालयात घेतले महामानवांचे दर्शन

महाराष्ट्र न्युज नेटवर्क मुंबई : उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर आज पहिल्यांदा मंत्रालयात आलेल्या उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी मंत्रालयात आल्यानंतर सर्वप्रथम मंत्रालयाच्या तळमजल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ माँसाहेब, महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवांच्या प्रतीमेस पुष अर्पण करून अभिवादन केले, तसेच या महामानवांच्या विचारांवर राज्यकारभार करण्याचा दृढनिर्धार केला. यावेळी त्यांच्यासोबत … Read more

अभंग व भजन स्पर्धेतल्या सहभागी बंद्यांना मिळणार विशेष माफी

महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : येथील शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठान, पोलिस महासंचालक व कारागृह महानिरीक्षक अमिताभ गुप्ता यांच्या संयुक्त विद्यमाने कारागृहातल्या बंदीजनांसाठी राज्यस्तरीय अभंग व भजन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व बंद्यांना माफी देण्याची घोषणा कारागृह महानिरीक्षक अमिताभ गुप्ता यांनी केली आहे. शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष लक्ष्मीकांत … Read more

समर्थ पोलिस स्टेशन हद्दीत 10 लाख रूपये किंमतीच्या मेफेड्रोन सह तस्कर ताब्यात

महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : येथील समर्थ पोलिस स्टेशन परिसरात मेफेड्रोन नावाच्या अमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या मुजाहिद शेख, वय 25, रा. भवानी पेठ याला 10 लाखाच्या मुद्देमालासह पोलिसांनी ताब्यात घेतले. अमली पदार्थांच्या गैरव्यवहाराची माहिती काढण्यासाठी पेट्रोलिंग करत असताना पोलिस नाईक साहिल शेख व पोलिस कॉन्स्टेबल अझीम शेख यांना याबाबत खबर मिळाली होती. त्यानुसार छापा मारून … Read more

आई -वडीलांच्या बोलण्यामुळे चिमुकल्यांनी सोडले घर

बस वाहकाची सतर्कता : बार्शी पोलिसांनी दिले पालाकांच्या ताब्यात महाराष्ट्र न्यूज नेटवर्क बार्शी : घरी आई-वडिलांसोबत झालेल्या भांडणाचा राग मनात ठेवून दोन चिमुकल्यांनी थेट घर सोडून पुणे गाठण्याचा निर्णय घेतला. मात्र बस वाहकाच्या सतर्कतेमुळे ते दोन्ही मुले बार्शी पोलिसांनी सुखरूप पालकांच्या ताब्यात दिली. बार्शी शहरातील एस. टी. स्टॅंड येथे दोन अल्पवयीन मुले बालस्नेही कक्षामध्ये आले … Read more

मा. नगरसेवक प्रवीण चोरबेले यांच्या वाढदिवसानिमित्त वह्यांचे वाटप

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : मा. नगरसेवक प्रवीण चोरबेले यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी दि पूना मर्चंट चेंबरचे पदाधिकारी उपस्थिती होते.

चुहा गँगचा सुत्रधार साकीब मेहबुब उर्फ लतीफ बागवान भारती विद्यापीठ पोलिसांकडून जेलबंद

सहा महिन्यांपासून फरार आरोपीला अटकेची पोलिसांची कामगिरी महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत पोलिसांना हवा असलेला प्रमुख आरोपी चुहा गँगचा सूत्रधार साकीब मेहबुब चौधरी उर्फ लतीफ बागवान वय वर्ष 23, रा. लुनिया बिल्डिंग, कात्रज याला अटक कऱण्यात आली आहे. गेल्या 16 फेब्रुवारीपासून हा फरार होता. कात्रज परिसरात गुन्हा केल्यानंतर तो फरार … Read more

फार्मा युथ: उज्ज्वल भविष्यासाठी तरुण उद्योजकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न

महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : फार्मास्युटिकल उद्योगात फार्मा युथ हा डायनॅमिक फोरम एक वर्षापूर्वी स्थापन झाला आहे. तरुण आणि महत्त्वाकांक्षी उद्योजकांनी स्थापन केलेल्या या व्यासपीठाचा उद्देश विकास आणि नेटवर्किंगच्या संधींना चालना देण्यासाठी सर्व घाऊक फार्मा वितरक आणि स्टॉकिस्ट यांना एकत्र आणण्याचा आहे. Market क्रांती घडवण्याच्या दृष्टीकोनातून, हे तरुण नेते आव्हानांवर मात करण्यासाठी आणि उद्योगाला पुन्हा … Read more

पिस्तुलातून पत्रकारांवर गोळी झाडून हत्येचा प्रयत्न करणाऱ्या गुन्हेगारांना अटक

महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : वृत्तमाध्यमांमध्ये काम कऱणाऱ्या व्यक्तीवर पिस्तुलातून गोळी झाडून जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन गुन्हेगारांना स्वारगेट पोलिसांनी जेरबंद केले आहे. दिनांक ११ जून रोजी रात्री ९ वाजता फिर्यादीच्या राहत्या घराजवळ मोपेडवरून आलेल्या 5 आरोपींनी पाठलाग करत जवळच्या पिस्तुलातून गोळी झाडली. फिर्यादी गाडीवरून पडल्याने ते बचावले. त्यानंतर पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. या … Read more