आवृत्ती पुणे

भूम तालुक्यात वंचित बहुजन आघाडीची नूतन कार्यकारिणी निवड २९ मे रोजी

महाराष्ट्र न्युज नेटवर्क भूम : वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटन अधिक बळकट करण्यासाठी जिल्हास्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले. ही बैठक मंगळवारी छत्रपती शिवाजी महाराज नगरपरिषद नाट्यगृह, धाराशिव येथे संपन्न झाली. या बैठकीला पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर प्रमुख उपस्थित होते. बैठकीत धाराशिव जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याचा … Read more

धाराशिव’ला मिळाली ओळख – ओमराजेंच्या पाठपुराव्याला यश

उस्मानाबाद रेल्वे स्थानकाचं नामांतर अखेर ‘धाराशिव’ – केंद्र सरकारचा ऐतिहासिक निर्णय महाराष्ट्र न्यूज नेटवर्क धाराशिव : धाराशिव जिल्ह्याच्या ऐतिहासिक अस्मितेला न्याय देणारा ऐतिहासिक निर्णय अखेर घेण्यात आला आहे. केंद्र सरकारकडून ‘उस्मानाबाद रेल्वे स्थानकाचे’ अधिकृत नामांतर करून ‘धाराशिव रेल्वे स्थानक’ असे करण्यात आले असून, या निर्णयामुळे जिल्ह्यात सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे. या नामांतरासाठी खासदार ओमप्रकाश (ओमराजे) … Read more

यशस्वी कामगिरीबद्दल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पीएमआरडीएच्या महानगर आयुक्तांचा गौरव

शंभर दिवसांच्या कार्यक्रमांतील तिसऱ्या स्थानाबद्दल मंत्रालयात द‍िला पुरस्कार महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री – १०० दिवस कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमातंर्गत पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने उत्कृष्ट कामगिरी नोंदवत तिसरे स्थान मिळवले. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल मंगळवारी (दि. २० मे) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पीएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. योगेश … Read more

धमकीच्या फोननंतर युवासेना जिल्हा प्रमुखाच्या गाडीवर गोळीबार

वारजे येथील गणपती माथा कार्यालयाबाहेरील मध्यरात्रीची घटना महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : शिवसेना शिंदे गटाचे युवासेना जिल्हा प्रमुख निलेश घारे यांना रेकॉर्डवरील गुन्हेगाराने धमकी देणारा फोन सोमवारी सायंकाळी केला. याची तक्रार त्यांनी वारजे पोलिसांकडे केली. त्यानंतर काही वेळातच मध्यरात्रीच्या सुमारास कार्यालयाबाहेर पार्क केलेल्या त्यांच्या गाडीवर गोळीबार झाला. दुचाकीवरून आलेल्या दोघांपैकी एकाने गोळीबार केला. ही घटना … Read more

लागा तयारीला, महापालिका निवडणुका होणार चार महिन्यात

सर्वोच्च न्यायालयाचा आदेश : जुन्या आरक्षणाप्रमाणे निवडणुका घ्या महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रखडलेल्या निवडणुका पुढील ४ महिन्यांच्या आत घ्या, असा महत्वपूर्ण आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे गेली ३ वर्षे रखडलेल्या महापालिकांसह जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला आहे. महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची अधिसूचना पुढील चार आठवड्यांत निघाली पाहिजे. यानंतर … Read more

शिव-बसव मिरवणूक जल्लोषात पार, अघोरी नृत्याने जिंकली बार्शीकरांची मने

मित्रप्रेम युवा ग्रुपतर्फे भव्य मिरवणूक : मशीदसमोरील कव्वालीने वातावरणात भर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क बार्शी – पवन श्रीश्रीमाळ : महात्मा बसवेश्वर महाराज व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मित्रप्रेम युवा ग्रुपतर्फे आयोजित ‘शिव-बसव मिरवणूक’ जल्लोषमय वातावरणात पार पडली. या मिरवणुकीत विविध पथकांनी सहभाग घेतला असून, राहिमतपूर येथील अघोरी नृत्य पथकाच्या सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली. मिरवणुकीचा प्रारंभ … Read more