आवृत्ती पुणे

पर्यावरणाचे नुकसान टाळण्यासाठी बांबू लागवडीस प्राधान्य द्या- प्रविण दराडे

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : जागतिक तापमानवाढीमुळे हवामान बदलाचा गंभीर प्रश्न निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर पर्यावरणाचे नुकसान टाळण्यासाठी बांबू लागवडीस प्राधान्य द्यावे आणि मोठ्या प्रमाणावर बांबूची लागवड करावी, असे आवाहन पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाचे प्रधान सचिव प्रविण दराडे यांनी केले. मनरेगा अंतर्गत बांबू व फळबाग लागवड कार्यक्रम राबविण्यासाठी विधान भवन येथे पुणे विभागातील … Read more

पार्ट टाईम जॉबचे अमिष दाखवुन फसवणुक

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : ऑनलाईन माध्यमाव्दारे अज्ञात मोबाईल धारकाने पार्टटाईम जॉबचे अमिष दाखवुन टास्कच्या बदल्यात कमिशन देण्याच्या बहाण्याने बहाण्याने आर्थिक फसवणुक केल्याची घटना घोरपडी येथे घडली आहे. मुंढवा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अनोळखी ने मोबाईल वरून ४० वर्षीय फिर्यादीशी संपर्क साधला व त्यांना टास्कच्या बदल्यात कमिशन देण्याचे आमिष दाखवले. वेगवेगळे टास्क देऊन बँक खात्यात २३,९५,५० … Read more

त्रास देणाऱ्या दाजीचा मेव्हण्याने काढला काटा

लुल्लानगर-वानवडीतील खुनाचा उलगडा महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : वानवडीतील अनोळखी व्यक्तीच्या खुनाचा उलगडा करण्यात पोलिसांना अवघ्या २४ तासात यश आले आहे. प्रेम विवाह केलेल्या बहिणीच्या पतीचा काटा मेव्हण्याने काढल्याचे उघड झाले आहे.पोलिसांनी दोघाना अटक केली आहे. दि. २४ जून रोजी विक्रम बात्रा वसाहत समोर, केंद्रीय महाविद्यालयाचे बाजुला लुल्लानगर, वानवडी पुणे येथे एक अनोळखी इसमाचा अज्ञात … Read more

शेअर्स ट्रेडिंग मध्ये नफ्याचे प्रलोभन दाखवुन फसवणुक

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : शेअर्स ट्रेडिंग मध्ये नफ्याचे प्रलोभन दाखवुन ४४,०४,०००/- रू. गुंतविण्यास भाग पडून फसवणुक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात टिंगरे नगर येथील एका ४२ वर्षाच्या इसमाने फिर्याद दिली आहे. २७ फेब्रुवारी पासून गेले मे महिन्यापर्यंत काही महिन्यात अनोळखी मोबाईल धारकाने त्यांना शेअर्स मध्ये गुंतवणूक … Read more

शंभर वर्ष जुनी तुतारी शरद पवार यांना भेट

शरद क्रीडा सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या रौप्य महोत्सव वर्षानिमित्त गौरव महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : लोकसभेच्या निवडणुकीत शरद पवार यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळाल्याबद्दल २२ जून रोजी शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीने, संस्थापक, अध्यक्ष लक्ष्मीकांत खाबिया यांच्या संकल्पनेतून साकारलेले १०० वर्ष जुन्या तुतारीचे भव्य सन्मानचिन्ह लोकनेते शरद पवार यांना भेट देऊन त्यांचा गौरव … Read more

उच्चशिक्षितांनी नवोन्मेषक, व्यावसायिक नेतृत्व व्हावे- राज्यपाल

सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचा पदवीप्रदान सोहळा महाराष्ट्र न्यूज नेटवर्क उच्चशिक्षित, पदवीधरांनी नोकरीच्या मागे न लागता नवोन्मेषक, उद्योजक, व्यावसायिक नेतृत्व आणि स्टार्टअप निर्माते बनावे. तसेच गरिबी, वंचितता, युद्ध, अस्थिरता आदी इतर कारणांमुळे समाजाच्या परीघावर जगणाऱ्यांचा विचार करावा, असे आवाहन राज्यपाल रमेश बैस यांनी केले. सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठ लवळे येथे आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांच्या पदवीप्रदान सोहळ्यात रमेश बैस बोलत होते. … Read more

फर्निचर व्यावसायिकांची पाचगणीत वार्षिक सभा

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : ऑल इंडिया फर्निचर अँड ट्रेडर्स लिमिटेड च्या कोअर कमिटीची सभा नुकतीच पाचगणी येथे पार पडली. या सभेसाठी देशभरातून संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. या सभेत सर्व प्रतिनिधींनी व्यवसाय वाढीसाठी काय करता येईल तसेच समस्या बाबत चर्चा केली. मुंबई अॅपेक्स कमिटीचे चेअरमन हुझेफा सॅम्पलवाला वाला यांनी ब्युरो ऑफ इंडिया स्टँडर्ड (BIS) बाबत … Read more

‘राज्य महिला आयोग’ गुरुवारी सातारा जिल्हयात

तक्रारी मांडण्याचे अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचे महिलांना आवाहन महाराष्ट्र न्यूज नेटवर्क मुंबई : महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडून ‘महिला आयोग आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत सातारा जिल्हयातील तक्रारींची जनसुनावणी गुरुवार दि. २७ जूनरोजी नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, सातारा येथे सकाळी ११ वाजता होणार आहे. आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर आणि सदस्य सचिव माया पाटोळे तक्रारींची सुनावणी घेणार आहेत. … Read more