आवृत्ती पुणे

कात्रज भागात ‘धूम’ स्टाईल चोरी!

काही वर्षांपूर्वी ‘धूम’ चित्रपटाने सर्व प्रेक्षकांना भुरळ घातली होती. या चित्रपटामध्ये आरोपी गाडीवरून चोऱ्या करत. तशीच काहीशी घटना कात्रज भागात घडली आहे. एकाच दिवशी या तिन्ही महिलांना दुचाकीवरून दोन चोरट्यांनी येऊन लुटले आहे.

घरकाम करणाऱ्या महिलेने केले लाखो रुपये साफ!

पूना क्लब भागात राहत असलेल्या एका महिला डॉक्टरने आपल्या आई-वडिलांच्या सेवेसाठी कामावर ठेवलेल्या कामवाल्या बाईने सेवा करीत करीत लाखो रुपयांचा मेवा खाल्ल्याची घटना समोर आली आहे.

‘तणाव मुक्ती’ विषयावर व्याख्यान

पुणे : महाराष्ट्र 360 न्यूज नेटवर्क लष्कर पोलीस स्टेशन या ठिकाणी अशोक देशमुख यांचे ‘तणाव मुक्ती’ विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. सदर व्याख्यानास वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम, पोलीस निरीक्षक कविदास जांभळे, एपीआय हरिश शिळमकर, पीएसआय नीलेश महाडिक यांसह 40 कर्मचारी हजर होते.

पोलीस कार्यालये ही जनेतेच्या सेवेसाठी!

अमिताभ गुप्ता : वानवडी सहाय्यक पोलीस आयुक्त कार्यालयाचे उद्घाटन पुणे : महाराष्ट्र 360 न्यूज नेटवर्क पोलीस स्टेशन किंवा पोलीसांसाठी बनविण्यात आलेली सर्व कार्यालये हे जनतेच्या सेवेसाठीच असतात आम्ही अधिकारी फक्त दोन वर्षासाठी ती सांभाळत असतो. ही कार्यालये मोठी,देखणी व स्वच्छ असावीत अशी अपेक्षा पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी व्यक्त केली. कात्रज-कोंढवा रस्त्यावरील खडीमशीन चौकी … Read more

अट्टल मोटरसायकल चोराकडून चोरीच्या पाच मोटरसायकली जप्त

बार्शी शहर पोलिसांची कामगिरी : सव्वा लाखाच्या मुददेमालासह आरोपी जेरबंद बार्शी : महाराष्ट्र 360 न्यूज नेटवर्क अट्टल मोटरसायकल चोरास अटक करून त्याच्याकडून चोरीच्या पाच मोटरसायकली जप्त करण्यात बार्शी शहर पोलिसांना यश आले असून, एकूण सव्वा लाखाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. 4 ऑगस्ट रोजी बार्शी शहरामध्ये पेट्रोलिंग दरम्यान संशयित एक इसम त्याच्याकडील काळ्या रंगाची सीबी … Read more

व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसला तलवारीचे फोटो टाकणार्‍या युवकास अटक

भारती विद्यापीठ पोलिसांची कामगिरी : कात्रज परिसरामध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न पुणे : महाराष्ट्र 360 न्यूज नेटवर्क सोशल मीडियावरील व्हॉट्सअ‍ॅपवरच्या स्टेटसवर तलवारीचे फोटो टाकून दहशत निर्माण करणार्‍या आरोपीस भारती विद्यापीठ पोलिसांनी शिताफीने पकडून अटक केली, असून त्याच्याकडून विनापरवाना असलेली तलवार जप्त करण्यात आली आहे. 07 ऑगस्ट रोजी तपासपथकाचे अधिकारी नितीन शिंदे आणि स्टाफ भारती विद्यापीठ … Read more

वाढदिवसाचा केक धारदार तलवारीने कापून दहशत माजविणार्‍या दोघांना अटक

दत्तवाडी पोलिसांची कारवाई : सात तलवारींसह तलवार बनवणाराही ताब्यात पुणे : महाराष्ट्र 360 न्यूज नेटवर्क वाढदिवसाचा केक धारदार तलवारीनी कापून दहशत माजविणार्‍या दोघांना दत्तवाडी पोलिसांची अटक केली असून, याकामी सात तलवारींसह तलवार बनवणार्‍यालाही ताब्यात घेतले आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक प्रमोद खरात हे करीत आहेत. पुणे शहरात गुन्हेगार आणि युवक धारदार हत्यारांचा वापर करून … Read more

लायन्स क्लब बार्शी टाऊन आणि लिओ क्लब बार्शीकडून चिपळूण येथील पूरग्रस्तांना मदत

140 पोती ज्वारी, 1200 साड्या, 400 ड्रेस किट आणि पशुखाद्यासह संसारोपयोगी साहित्याचा समावेश महाराष्ट्र 360 न्यूज नेटवर्क लायन्स क्लब बार्शी टाऊन व लिओ क्लब बार्शी यांच्याकडून संयुक्तपणे चिपळूण येथील पूरग्रस्तांना 140 पोती ज्वारी, 1200 साड्या, 400 ड्रेस किट आणि पशुखाद्यासह संसारोपयोगी साहित्याची मदत करण्यात आली. कोकणासह पश्‍चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांत अतिवृष्टीने आपद्ग्रस्त झालेल्या नागरिकांना रत्नागिरीचे उपजिल्हाधिकारी … Read more

बुलेट आणि दुचाकी वाहने चोरणारी टोळी जेरबंद

दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक 2 गुन्हे शाखेची कामगिरी : पाऊणेपाच लाखांची 15 वाहने हस्तगत पुणे : महाराष्ट्र 360 न्यूज नेटवर्क दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक 2 गुन्हे शाखा, पुणे शहरने अनोखी कामगिरी करत नव्याने उदयास आलेल्या बुलेट आणि दुचाकी वाहने चोरणार्‍या टोळीस जेरबंद केले असून, एकूण बारा गुन्हे उघडकीस आणत पाऊणेपाच लाख रुपयांची 15 … Read more