आवृत्ती पुणे

राखी गुगळे यांना वुमन ऑफ द इयर पुरस्कार प्रदान

महाराष्ट्र जैन वार्ता : अभिजित डुंगरवाल पुणे : योगसाधना या संस्थेतर्फे आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त वुमन ऑफ द इयर पुरस्कार-२०२४ जाहीर करण्यात आला. राखी गुगळे यांना वुमन ऑफ द इयर पुरस्कार प्रदान करण्यात आला. वेद ब्रह्मा योगा क्लासेसच्या संस्थापिका राखी गुगळे यांना त्यांच्या योगातील गौरवास्पद कार्यामुळे एकमताने हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी योगसाधना संस्थेच्या अध्यक्षा … Read more

महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर अन्नपदार्थांची तपासणी

सोलापूर : महाशिवरात्रीच्या अनुषंगाने विविध खाद्यपदार्थ, अन्न उत्पादन विक्रेते, व्यावसायिकांसह किराणा दुकान व वितरकांची तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. खाद्यतेल, साबुदाणा, भगर यांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात येणार आहेत, असे अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त सुनिल जिंतुरकर यांनी सांगितले. नागरिकांनी नोंदणी परवानाधार व्यवसायिकांकडून अन्नपदार्थ विकत घ्यावेत. भगर किंवा साबुदाणा पॅकबंद व ब्रॅण्डेडच विकत घ्यावे. मुदतबाह्य … Read more

मेकॅनिकची मुलगी बनणार डॉक्टर

वयाच्या २१ व्या वर्षी NEET परीक्षा केली क्रॅक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल नवी दिल्ली : आरती झा ने पहिल्याच प्रयत्नात नीट परीक्षा उत्तीर्ण केली आहे. देशातील सर्वांत कठीण परीक्षांपैकी एक म्हणजे NEET परीक्षा. ही परीक्षा उत्तीर्ण करणे तितकेसे सोपे नाही. दिवस-रात्र अभ्यास करून व कठोर परिश्रम घेऊनही अनेक विद्यार्थी ही परीक्षा उत्तीर्ण करू … Read more

छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वश्रेष्ठ मुत्सद्दी : प्रा. कोळेकर

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : सुनीलकुमार डुंगरवाल भूम : छत्रपती शिवाजी महाराज हे एक सर्वश्रेष्ठ मुत्सद्दी व शासनकर्ते होते असे प्रतिपादन प्रख्यात वक्ते प्रा. नितिन कोळेकर यांनी व्यक्त केले. शंकरराव पाटील महाविद्यालय येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त आज प्रा.नितिन कोळेकर यांचे व्याख्यान महाविद्यालयातील इतिहास, समाजशात्र व NSS विभाग यांच्या संयुक्त विद्यमनाने आयोजित केले होते. कार्यक्रमाच्या … Read more

जितो स्पोर्टस् कार्निवलला शानदार सुरुवात

महिनाभर चालणार खेळांचा उत्सव महाराष्ट्र जैन वार्ता : अभिजित डुंगरवाल पुणे : जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन (जितो ) तर्फे आत्तापर्यंतच्या सर्वात मोठ्या अशा जितो स्पोर्ट्स कार्निवलला १७ फेब्रुवारी रोजी उत्साहात सुरुवात झाली. तब्बल महिनाभर चालणाऱ्या या क्रीडा महोत्सवामध्ये एकूण १० क्रीडा प्रकारांचा समावेश आहे. पूनावाला फिनकॉर्प हे स्पर्धेचे टायटल स्पॉन्सर्स असून मकवाना अँड तन्मय कंस्ट्रक्शन्स … Read more

अल्प दरातील एम.आर.आय व सिटी स्कॅनचे उद्‌घाटन

महाराष्ट्र जैन वार्ता : अभिजित डुंगरवाल पुणे : येथील डायग्नोपिन या संस्थेच्या वतीने नगर येथील सुरभि हॉस्पिटल मध्ये सवलतीच्या दरात एम.आर.आय आणि सिटी स्कॅन सुविधेचे उद्घाटन अहमदनगर महानगपालिकाचे आयुक्त डॉ. पंकज जावळे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना डॉ. जावळे म्हणाले की, डायग्नोस्टिक सेवेची आज समाजामध्ये खूप मोठ्या प्रमाणात गरज आहे. आज दिवसेंदिवस अनेक रोगाचे … Read more

आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करा

तहसिलदार जयवंत पाटील यांचे आवाहन महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : सुनीलकुमार डुंगरवाल भूम : विशेष सहाय्य योजनेअंतर्गत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत सर्व लाभार्थीनी दिनांक ३१ मार्च २०२४ पर्यंत आपले आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करून घ्यावे असे आवाहन करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने सर्व लाभार्थीनी आधार कार्ड व … Read more

राज्यस्तरीय वार्षिक क्रीडा उत्साहात

महाराष्ट्र कारागृह विभागामार्फत आयोजन महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : कारागृहातील अधिकारी / कर्मचारी यांच्याकरीता राज्यस्तरीय वार्षिक क्रीडा स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा दौलतराव जाधव तुरुंग अधिकारी प्रशिक्षण महाविदयालय, येरवडा, येथे करण्यात आली आहे. या राज्यस्तरीय वार्षिक क्रीडा स्पर्धाचे उदघाटन १२ फेब्रुवारी रोजी अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक अमिताभ गुप्ता यांच्या … Read more

महावीर कदम बनले पहिले टायगर मॅन

ट्रायथ्लॉन स्पर्धेत यश ११ तास ७ मिनिटात पार केले 183 किमी अंतर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ सोलापूर-बार्शी : भारत सरकारद्वारे चालविल्या जाणाऱ्या फीट इंडिया चळवळीला प्रोत्साहन देण्यासाठी नागपुरात टायगरमॅन अल्ट्रा ट्रायथलॉन स्पर्धेचे आयोजन १० व ११ फेब्रुवारी रोजी करण्यात आले होते. बार्शीकर महावीर कदम यांनी ही स्पर्धा वैयक्तिक गटात यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. … Read more