आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

माहिती अधिकार कायद्यातील अर्ज निर्गती करावेत

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • March 21, 2022
Spread the love

विवेक वेलणकर : लष्कर पोलीस स्टेशनमध्ये कार्यशाळेचे आयोजन

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : माहिती अधिकार अर्जाचा कालावधी कसा असतो, अर्ज लवकरात लवकर कसे निर्गती करायचे, तसेच कायदा २००५च्या कलमांची माहिती, अधिकाराचे कामकाज पाहणारे अधिकारी-अंमलदार यांच्या शंकांचे निरसन सजग नागरिक मंचचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी केले.

लष्कर पोलीस स्टेशनमध्ये नागरिकांना माहिती अधिकार कायद्यामध्ये माहिती लवकर मिळावी यासाठी कार्यशाळा आयोजित केली होती. याप्रसंगी सहायक पोलीस आयुक्त सागर पाटील, लष्कर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम, ॲड. राहुल पाटील, शांतता कमिटी सदस्य, पोलीस स्टेशनमधील अधिकारी, अंमलदार उपस्थित होते.