आवृत्ती पुणे
← Back to Homepage

अप्पर डेपो भागात खाद्यपदार्थ कारखान्याला भीषण आग

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • March 22, 2022
Spread the love

शॉटसर्किटमुळे दुर्घटना : मोठे नुकसान टळले

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : अप्पर इंदिरानगर बस डेपोमागील भागातील अण्णा भाऊ साठेनगर येथील खाद्यपदार्थ बनविण्याच्या कारखान्याला भीषण आग लागली.

आग लागून कारखान्याचे मोठे नुकसान झाले आहे. उन्हामुळे वातावरणातील उष्णता वाढली असून, शॉटसर्किट होण्याचे प्रमाण वाढले. त्यातून आग लागल्याचा अंदाज आहे.

पत्राच्या शेडमध्ये असणाऱ्या पोटमाळ्यात हा कारखाना उभा होता. या भागात दाट लोकवस्ती असून, अगदी जवळ-जवळ घरे आहेत. तसेच छोटे-मोठे कारखाने देखील आहेत. आगीने रौद्ररूप धारण केले होते. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक केंद्राच्या गाड्या घटनास्थळी पोहचल्या व आग विझविण्यास सुरूवात केली. माजी नगरसेवक प्रकाश कदम, प्रगती फाउंडेशनचे अध्यक्ष प्रतीक कदम हे कार्यकर्त्यासह घटनास्थळी पोहचले.

कात्रज अग्निशमनचा १ बंब, मध्यवर्ती केंदातून एक टैंकर अग्निशमनच्या गाडया, कर्मचारी घटनास्थळावर दाखल झाले. संजय रामटेके व कर्मचारी यांनी आग आटोक्यात आणली.

get_footer();