सामाजिक सुरक्षा विभागाची कारवाई : 20 जणांवर गुन्हा, दीड लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त
महाराष्ट्र 360 न्यूज नेटवर्क
पुणे : ससून हॉस्पिटल सर्व्हंट क्वार्टर्स कंपाऊंडच्या आतील भिंतीलगत बेकायदेशीर जुगार अड्ड्यावर सामाजिक सुरक्षा विभागाच्या गुन्हे शाखेने छापा टाकून कारवाई केली. यावेळी अंदर बाहर हा पत्त्याचा जुगार पैशावर खेळणाऱ्यांकडून एक लाख 48 हजार 80 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. जुगार खेळणाऱ्या 20 जणांवर बंडगार्डन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे.
फरार आरोपी शाबीद हसन शेख (वय 49) व आयुब हसन शेख (दोघे रा. नाना पेठ, पुणे) व त्यांचे जुगार घेणारे साथीदार राहुल रामनरेश गुप्ता (वय 27, रा. एस.आर.ए. बिल्डिंग डी-907, कैलास सुपर मार्केटजवळ, विमाननगर, पुणे), शुभम हरिश्चंद्र तळेकर (वय 26, रा. केम, ता. करमाळा, जि. सोलापूर), सचिन सूर्यकांत गुरव (वय 43, रा. मालधक्का, पदपथ, पुणे), अजय रघुनाथ यल्लमवार (वय 40, रा. सेव्हन लव्हज चौक, बँक ऑफ महाराष्ट्रचे बाजूला स्वारगेट, पुणे), अक्षय नारायण पाटील (वय 23, रा. रेल्वे स्टेशन फिरस्ता, पुणे, मूळ गाव- मु.पो. दिदोरा, ता. बालापूर, जि. अकोला) यांच्यासह पैशावर बेकायदेशीर अंदर बाहर हा पत्त्यांचा जुगार खेळणाऱ्या किशोर मंजुनाथ तलवार (वय 40, रा. 394, बुधवार पेठ, पुणे), आनंद हनमंतराव मराठे (वय 27, रा. विगनीवस्ती, ता. दौंड, जि. पुणे), काशिनाथ हजारे (वय 41, रा. 611, भवानी पेठ, पुणे), जावेद चाँदखान पठाण (वय 54, रा. 294, गोखलेनगर, पुणे), राकेश गोपाळ राठोड (वय 26, रा. 17 क्विन्स गार्डन, आऊट हाऊस, पुणे), सलमान हुसेन शेख (वय 20, रा. 482, गुरुवार पेठ, पुणे), अमित मारुती पुजारी (वय 36, रा. गल्ली नं.26, ताडीवाला रोड, पुणे), उमेश गोरख सावंत (वय 30, रा. गल्ली नं.10, पाटील इस्टेट, शिवाजीनगर, पुणे), रफिक अब्दुल शेख (वय 36, रा. 226, मंगळवार पेठ, पुणे), हनुमंत धोंडिबा मोरे (वय 25, रा. कस्तान चाळ, गॅस गोडाऊनशेजारी दौंड, ता. दौंड, जि. पुणे), संतोष गुरुलिंग चनशेट्टी (वय 43, रा. मिल्ट्री कॉलनी, हडपसर, पुणे) आणि फरार आरोपी शाहरुख व दाढी वाढविेलेला इसम अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
ससून हॉस्पिटलच्या सर्व्हंट क्वार्टर्सच्या कंपाऊंड भींतीच्या आतील बाजूस पत्र्याच्या शेडमध्ये बेकायदेशीर पैशावर पत्त्यांचा जुगार खेळत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत कारवाई करून 20 जणांवर गुन्हा दाखल केला. अंदर बाहर जुगारासाठीचे साहित्य आणि रोख रक्कम असा एकूण एक लाख 48 हजार 80 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. बंडगार्डन पोलीस पुढील तपास पोलीस करीत आहेत.
पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश पुराणिक, पोलीस उपनिरीक्षक पंढरकर, पोलीस अंमलदार मनिषा पुकाळे, अण्णा माने, हणमंत कांबळे, अश्विनी केकाण, संदीप कोळगे, स्नेहा धुरी यांच्या पथकानेही दमदार कामगिरी केली.
